90 चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रविना टंडन (raveena tondon). प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीची लोकप्रियता अद्यापही कमी झालेली नाही. त्यामुळे वरचेवर चाहत्यांमध्ये तिची चर्चा रंगताना पाहायला मिळते. सध्या रविनाने तिचा मोर्चा ओटीटीकडे वळवला असून ती काही वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या तिचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत आलं असून अभिनेता अजय देवगणने (ajay devgn) तिला खोटारडी असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.
'दिलवाले' या चित्रपटात अजय आणि रविना यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटानंतर या जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली. इतकंच नाही तर त्यांच्या अफेअर्सच्या चर्चाही रंगल्या होत्या. अलिकडेच रविनाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अजयसोबत असलेल्या नात्यावर भाष्य केलं. परंतु, तिची ही मुलाखत पाहिल्यावर अजयने तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
काय म्हणाली रविना?
रविनाने दिलेल्या मुलाखतीत तिने अजयसोबत आपण रिलेशनमध्ये होतं असं म्हटलं. इतकंच नाही तर अजयने मला प्रेमपत्र पाठवले होते असंही तिने सांगितलं. रविनाचं हे वक्तव्य ऐकल्यावर अजय तिच्या या वागण्याला पब्लिसिटी स्टंट म्हटलं होतं. इतकंच नाही तर ती खोटारडी आहे असंही तो म्हणाला.
काय म्हणाला अजय ?
"ती खूप नाटकी आहे. इतकंच नाही तर ती जन्मजात खोटारडी आहे", असं म्हणत अजयने तिच्यासोबत असलेल्या नात्यांच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.दरम्यान, रविना ही अजयची बहीण निलम हिची चांगली मैत्री होती त्यामुळे तिचं अजयच्या घरी येणं जाणं होतं. परंतु,आमच्यात तसं काही नातं नव्हतं असंही त्याने स्पष्ट केलं. अजयने अभिनेत्री काजोलसोबत लग्न केलं आहे. तर रविनाने उद्योगपती अनिल थडानीसोबत लग्नगाठ बांधली आहे.