Join us

रणवीर सिंगला डेट करताना दीपिका पादुकोणने त्याच्यासमोर ठेवली होती ही विचित्र अट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 11:28 AM

रणवीरला डेट करण्याआधी दीपिकाने त्याच्यासमोर एक अट ठेवली होती. दीपिकाने एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते.

ठळक मुद्देदीपिकाने सांगितले होते की, अनेकवेळा नात्यात माझी फसवणूक झाली होती. त्यामुळे प्रेम या शब्दावरचा माझा विश्वास उडाला होता. मी या सगळ्या गोष्टीमुळे प्रचंड कंटाळलेली होती.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांची जोडी सगळ्यांना खूप आवडते. बॉलिवूडमधील सगळ्यात क्यूट कपलमध्ये त्यांची गणना केली जाते. रणवीर दीपिकाच्या आयुष्यात येण्याआधी तिला अनेकवेळा प्रेमात धोका मिळाला होता. त्यामुळे कोणत्याही नात्यात पुन्हा एकदा पडताना ती विचार करत होती आणि अशाचवेळी रणवीर तिच्या आयुष्यात आला. रणवीर तिला आवडायला लागला होता. पण त्याला डेट करण्याआधी दीपिकाने त्याच्यासमोर एक अट ठेवली होती. दीपिकाने एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते.

दीपिकाने सांगितले होते की, अनेकवेळा नात्यात माझी फसवणूक झाली होती. त्यामुळे प्रेम या शब्दावरचा माझा विश्वास उडाला होता. मी या सगळ्या गोष्टीमुळे प्रचंड कंटाळलेली होती. तेव्हा मी केवळ कॅज्युएअल डेटिंगचाच विचार केला होता. भावनेच्या भरात कोणत्याही नात्यात पडायचे नाही असे मी ठरवले होते. २०१२ ला मी रणवीरला भेटले. मला तो आवडायला लागला होता. पण मी त्याला स्पष्ट सांगितले होते की, मला कोणत्याही कमिटमेंटमध्ये पडायचे नाहीये. पण काहीच महिन्यात दीपिका आणि रणवीरला त्यांचे खरे प्रेम उमगले आणि काहीच वर्षांत त्यांनी लग्न केले. 

१४ नोव्हेंबर २०१८ ला इटलीतील लेक कोमो इथल्या नयनरम्य व्हिलामध्ये दीपिका आणि रणवीरचा लग्न सोहळा पार पडला. लग्नाला केवळ त्यांचे जवळचे नातलग आणि मित्र मैत्रिणी उपस्थितीत होते. रणवीर आणि दीपिका यांनी दोघांनी सर्वप्रथम गोलियों की रासलीला-रामलीला या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा त्यांचा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटानंतर त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यानंतर बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या जोडीचा जलवा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्या दोघांची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

रणवीर आणि दीपिका संजय लीला भन्साळींच्या ‘रामलीला’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. तेव्हापासून या कपलच्या लव्हलाईफची चर्चा होती.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग