बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone)ला अलीकडेच कोरोना झाला आहे. सोशल मीडियावर तिच्या आरोग्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. दरम्यान, तिची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. त्यात तिने रणबीर कपूर ((Ranbir Kapoor) ) बद्दल मोठा खुलासा केला.
२०११ मध्ये एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने रणबीर कपूरवर फक्त फसवणूक केल्याचा आरोप केला होता. दीपिकाने रणबीरचे नाव न घेता एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्यासाठी नातेसंबंध खूपच वेगळे आहेत. मी एखाद्यासोबत नात्यात असताना त्याला कधीच धोका देणार नाही. मला मजामस्तीच करायची असेल तर मी सिंगल राहील... पण सगळ्यांचे विचार माझ्यासारखे नसतात. यामुळे मला खूप गोष्टींचा सामना करावा लागला. मी माझ्या बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडले होते. तो मला धोका देतोय हे कळल्यावर मी त्या नात्यातून बाहेर पडण्याचा विचार देखील केला होता. पण त्याने माझी माफी मागितली. माझ्याकडे अक्षरशः भीक मागितली.. त्यामुळे मी त्याला दुसरी संधी दिली. पण हीच माझी सगळ्यात मोठी चूक होती. कारण पहिल्यांदा त्याने मला धोका दिला, त्यावेळी माझी काही चूक असेल किंवा मी माझ्या नात्यात कमी पडले असेन मला वाटले होते. पण ज्याला धोका देण्याची सवयच असते तो कधी सुधारत नाही.
या मुलाखतीत तिने पुढे सांगितले होते की, मी नात्यात समोरच्याला खूप काही दिले. पण मला परत काहीच मिळाले नाही. एखाद्या नात्यातील विश्वास संपला की नाते तुटते असे मला वाटते.