''चिट्टीयां कल्लाईयाँ'' वे म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने बॉलिवूडमध्ये आज तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. फक्त अभिनयावरच नाही तर तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते चांगलेच फिदा आहेत. मात्र सुरूवातीच्या काळात भारतात राहणेही जॅकलिनसाठी अवघड झाले होते.
2016 मध्ये 'ढिशूम' सिनेमात जॅकलिन फर्नांडिसने आयटम डान्स केला होता. यात अगदी लहान स्कर्ट तिने घातला होता. तसेच कृपाण बांधले होते. साहजिकच तिचा हा लूक शीख बांधवांच्या भावना दुखावणार असाच होता. जेव्हा हे गाणे रिलीज झाले तेव्हा शीख बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याचे आरोप झाला. कृपाण धारण करने हे शीख धर्मियांसाठी श्रद्धेचे प्रतिक मानले जाते. अशा रितीने सिनेमात कृपाणचा वापर करण्यास त्यांचा विरोध होता. शीख समुदायाने सिनेमातून गाणे वगळण्यास सांगितले. इतकेच नाही तर जॅकलिनकडूनही माफीनामा मागितला होता. यानंतर जॅकलिनला अनेक धमक्याही मिळाल्या. जॅकलिनच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे तिने पोलिस सुरक्षाही मागितली होती. मात्र तिला कोणत्याही प्रकराचे संरक्षण पोलिसांकडून मिळाले नव्हते.
सतत मिळणा-या धमक्यांमुळे अखेर जॅकलिनलाच भारत सोडून जावे लागले. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच ती पुन्हा भारतात परतली होती. सेन्सॉर बोर्डानेही या गाण्यावर आक्षेप घेत काही आक्षेपार्ह सीन्सवरही कात्री मारली होती. या सिनेमामुळे प्रचंड गदारोळ झाला. परिणामी सिनेमा प्रदर्शित कधी झाला आणि कधी गेला. कोणालाच कळले नाही. सुपरफ्लॉप ठरलेला हा सिनेमा रूपेरी पडद्यावर रसिकांचे मनोरंजन करण्यातही अपयशी ठरला होता.