Join us

जेव्हा हेमामालिनी यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिली कार खरेदी केली होती तेव्हा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2018 11:35 AM

ड्रिम गर्ल नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री हेमामालिनी आता राजकारणात भूमिका बजावत आहेत. मात्र अशातही त्यांच्या मथुरा मतदारसंघात त्यांना राजकारणी ...

ड्रिम गर्ल नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री हेमामालिनी आता राजकारणात भूमिका बजावत आहेत. मात्र अशातही त्यांच्या मथुरा मतदारसंघात त्यांना राजकारणी नव्हे तर एक अभिनेत्री म्हणूनच अधिक ओळखले जाते. काही दिवसांपूर्वीच हेमामालिनी यांच्या फिल्मी करिअरच्या सुरुवातीच्या दिवसातील एक रंजक किस्सा समोर आला आहे. हा किस्सा हेमामालिनी यांच्या आयुष्यातील पहिल्या कार खरेदीचा आहे. होय, जेव्हा हेमा यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिली कार तेव्हा या कारचे कनेक्शन थेट त्यांच्या मतदारसंघाशी होते. वास्तविक त्यावेळी हेमा मुंबईमध्ये होत्या. मात्र त्यांच्या कारचा विक्रेता ठाकूर भीम सिंग हे मथुरा येथील कारब गावातील रहिवासी होते. हा किस्सा हेमा यांचे बंधू बलबीर यांना अजूनही स्मरणात आहे. बलबीर सांगतात की, जेव्हा हेमा यांनी ‘सपनों के सौदागर’ (१९६८) हा चित्रपट साइन केला, तेव्हा त्यांच्या आईला प्रचंड आनंद झाला होता. त्यावेळी मुंबईतील माटूंगा परिसरात ठाकुर भीम सिंग नावाचा एक कारविक्रेते विदेशी कारची विक्री करायचे. भीम सिंग मथुरा येथील कारब गावातील रहिवासी होती. त्यांनी राया येथील राष्टÑीय इंटर कॉलेजमधून त्यांचे शिक्षण पूर्ण केले होते. भीम सिंग त्यांच्या तारूण्यात चित्रपटात काम करण्यासाठी मुंबईत आले होते. मात्र चित्रपटात जम बसला नसल्याने त्यांनी विदेशी कारचे गॅरेज सुरू केले. हेमामालिनी त्यांच्या आईसोबत याच गॅरेजमध्ये आल्या होत्या. यावेळी हेमा यांनी अनेक कार बघितल्या. त्यातील एक कार त्यांना पसंत आली. मात्र जेव्हा कार खरेदी करण्याची वेळ आली तेव्हा त्यात पाच हजार रूपये कमी पडले. त्यानंतर हेमा यांच्या आईने पैसे नंतर फेडणार असल्याचा प्रस्ताव ठेवला. भीम सिंग यांनीदेखील तो प्रस्ताव आनंदाने स्वीकार केला. भीम सिंग आज हयात नाहीत. मात्र त्यांचा परिवार आज मुंबईत आनंदाने जीवन जगत आहे, तर दुसरीकडे हेमामालिनी त्यांच्या मथुरा मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत.