2010 मध्ये रोहित शेट्टीच्या 'सिंघम' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या काजल अग्रवालला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ती साउथमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे, काजल अग्रवालचा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या साध्या राहणीमानाने तिनं सगळ्यांनाच वेड लावले. पण एकदा तिचा टॉपलेस फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. मॅगझीनच्या कव्हर फोटोवर छापलेल्या त्या फोटोवरून बराच वाद झाला होता. काय होते हे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊया
वास्तविक, काजल अग्रवाल(Kajal Aggrawal) आणि वाद याचा फारसा संबंध नाही. पण 2011 मध्ये या अभिनेत्रीचे न्यूड फोटोशूट व्हायरल झाल्यामुळे मोठा वाद झाला होता.
मेन्स ग्लॉसी मॅगझिन FHM च्या कव्हर पेजवर काजल अग्रवालच्या टॉपलेस फोटोमुळे सगळीकडे खळबळ झाली होती. अभिनेत्रीचा हा अवतार ज्या कोणी पाहिला तो थक्क झाला. काजलच्या म्हणण्यानुसार तिलाही धक्का बसला होता. एवढेच नाही तर त्यांनी मॅगझिनवरच अनेक आरोप केले होते.
काजल अग्रवाल आणि तिचे फोटोशूट'हिंदुस्तान टाईम्स'च्या रिपोर्टनुसार, काजल अग्रवालने त्या मॅगझिनचा कव्हर फोटो बनावट असल्याचे सांगितले होते. कारण तिनं असे फोटोशूट कधीच केलं नाही. काजलने सांगितले की, तिने शूट दरम्यान परिधान केलेले जे कपडे होते ते फोटोशॉपद्वारे काढले गेले. 'मी त्या पद्धतीने फोटोशूट केले नाही. मासिकाच्या प्रसिद्धीसाठी माझ्या फोटोशी छेडछाड करण्यात आली. ती माझी मॉर्फ इमेज होती.
यानंतर मॅगझिनचे कार्यकारी संपादक कबीर शर्मा यांचं वक्तव्य आलं होतं. यामध्ये त्याने अभिनेत्रीने केलेले आरोप पूर्णपणे फेटाळून लावले होते. ते म्हणाले होते, “हे आरोप धक्कादायक आणि निराधार आहेत. आमच्याकडे काजलची स्वाक्षरी केलेला फॉर्म आहे. यामध्ये त्याने एसएमएस आणि मेलद्वारे ज्या गोष्टी बोलल्या होत्या आणि शूटसाठी कन्फर्म केले होते, त्या सर्व गोष्टींचा उल्लेख होता.