वयाने सैफ करीनापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे. मात्र एकत्र लग्नाचा निर्णय घेतला त्यावेळी करीनाने सैफसमोर एक अट ठेवली होती. सैफ नवाबच्या घराण्यातून होता. सैफशी लग्न करुन करीना बेगम बनणार होती. त्यामुळे पैशाची तिला काही कमी नव्हती. मात्र लग्नानंतरही बॉलीवुडमध्ये काम करत राहणार अशी अट तिने सैफपुढे ठेवली. सैफने याला लगेचच होकार दिला आणि दोघे रेशीमगाठीत अडकले. दोघांचे धर्म वेगवेगळे होते. मात्र दोघांच्या कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात दोघांचे लग्न लावून दिलं. त्यांचे लग्न धुमधडाक्यात व्हावं अशी खान आणि कपूर कुटुंबीयांची इच्छा होती. मात्र सैफ आणि करीनाला लग्नात कुठलाही बडेजावपणा नको होता. त्यानुसार दोघांचं लग्न साधेपणाने संपन्न झाले. लग्नानंतर अनेक अभिनेत्रींचे करिअर संपल्याची अनेक उदाहरणं आहेत. चंदेरी दुनियेपासून काही अभिनेत्री लांब गेल्या आणि संसारात रमल्या.
मात्र या गोष्टीसाठी करिनामात्र अपवाद ठरली. तिचेही सुरळीत सुरु असलेले करिअर संपेल असे अनेकांना वाटायचे. म्हणूनच करिनाला लोकं बोलायची लग्न करु नको, कारण लग्नानंतर अभिनेत्रींचं करिअर संपतं. असा सल्ला द्यायचे. यावर लोकमतला दिलेल्या मुलाखतीत तिच्याबाबत घडलेल्या गोष्टी शेअर केल्या. साहजिकच लग्नानंतर माझेही आयुष्य पूर्णपणे बदलले जबाबदा-या वाढत गेल्या. मुळात लग्न झालेल्या अभिनेत्रींना काम मिळत नाही. असा आपल्याकडे समज आहे.
माझ्याही बाबतीत असेच लोक बोलायची. तरीही मी लग्न केले. लग्नानंतर लोक बोलू लागले की मुलं झाल्यावर तर बिल्कुलच काम मिळणार नाही. मात्र माझ्याबाबतीत उलट घडत गेले. माझ्याकडे आज इतक्या ऑफर्स आहेत की, ते पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ नाही. म्हणूनच आजघडीला मी चित्रपट नाकारत आहे. कारण मला माझ्या कुटुंबाला आणि तैमूरला वेळ द्यायचा आहे. चित्रपट नाकारत असले तरी माझ्याकडे आज पाच चित्रपट आहेत. ज्या गोष्टी आजवर घडत होत्या त्या मी कायम बदलत राहिले.
मुळात पुरुषांपेक्षा महिलांमध्ये एकावेळी जास्त काम करण्याची क्षमता असते. त्यातच वेळेचं नियोजन करता येणं गरजेचं असतं. माझ्यासाठी वेळ ही खूप महत्तवाची असते. संध्याकाळी माझं शुटिंग असेल आणि सकाळी मी काहीच काम ठेवत नाही. त्यावेळी मी घरी राहणंच पसंत करते. सकाळी लवकर कामास सुरुवात करायलाही माझी काहीच हरकत नाही. रात्रीचं जेवण घरीच करणं मी पसंत करते.