'या' कारणामुळे करीना सैफसोबत पळून जावून करणार होती लग्न,अखेर आई- वडिलांना मान्य करावी लागली तिची अट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 02:57 PM2020-10-16T14:57:59+5:302020-10-16T15:04:23+5:30
करीना कपूर हिचे आधी अभिनेता शाहिद कपूरवर प्रेम होते. दोघंही लग्न करणार अशा चर्चाही रंगल्या होत्या. मात्र कुठेतरी दोघांमध्ये बिनसले आणि ते वेगळे झाले.
सैफ अली खान याची दोन लग्न झाली आहेत. पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंह हिच्याशी झालं होतं. त्या लग्नावेळी सैफची दुसरी पत्नी करीना ही चिमुकली शाळकरी मुलगी होती.ती सैफच्या लग्नात त्या शुभेच्छा देण्यासाठी आली होती. त्यावेळी सैफला अंकल अंकल संबोधणारी हिच
चिमुकली त्याच्याशी दुसरे लग्न करुन त्याची बेगम बनेल याची कल्पना त्यावेळी कुणीही केली नसेल. करीना कपूर हिचे आधी अभिनेता शाहिद कपूरवर प्रेम होते. दोघंही लग्न करणार अशा चर्चाही रंगल्या होत्या. मात्र कुठेतरी दोघांमध्ये बिनसले आणि ते वेगळे झाले.
त्याचवेळी करीनाच्या आयुष्यात सैफची एंट्री झाली आणि दोघे प्रेमात पडले. दोघांच्या आगळ्यावेगळ्या लव्ह स्टोरीची बॉलीवुडमध्ये चर्चा सुरु झाली. बराच काळ एकत्र घालवल्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
शाहिदशी ब्रेकअप झाल्यानंतर टशन सिनेमाच्या सेटवर सैफ करीना भेटले आणि दोघांतली जवळीक वाढू लागली. टशन सिनेमात सैफ,करीनासह अक्षयकुमारसुद्धा होता. त्यावेळी सैफचा स्वभाव बेबोला भावला. महिलांप्रती सैफच्या मनातील आदर पाहून ती त्याच्यावर लट्टू झाली.
अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी बेगम करीना कपूर खान लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करत आहेत. तसेही यंदाचे वर्ष या दोघांसाठी खूप खास आहे. कारण तैमुरनंतर आणखीन एक बाळ त्यांच्या घरी येणार आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबिय आनंदात आहे. नेहमीच या दोघांच्या लग्नाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यात रसिकांना उत्सुकता असते. वेळोवेळी खुद्द करिना तिच्या दिलेल्या मुलाखतीत दोघांची लव्हस्टोरीही सांगत असते.
मुळात करिनाचे जेव्हा सैफसह लग्न ठरले तेव्हा. करिनाला कोणत्याचीही प्रकारचा गाजावाज न करता शांततेत लग्न करायचे होते. मात्र करिनाच्या आई-वडिलांना लेकीचे लग्न थाटात करायचे होते.
आई- वडिलांना पटवण्यासाठी सैफसोबत पळून जाऊन लग्न करण्याचा इशाराच दिला होता. अखेर आ- वडिलांनाही आपल्या लेकीचा हट्टापुढे हार मानली जसे बेबो करिनाला हवे होते अगदी त्याचप्रकारे दोघांचे लग्न पार पडले होते. सैफ अली खान हा पतौडी घराण्याचा दहावा नवाब आहे.