Karisma kapor and Raveena Tandon Fight: प्रेमात आणि युद्धात सगळं काही मान्य असतं असं म्हणतात. लोक प्रेमात पडले की, त्यांची झोप उडते. त्यांचं डोकं काम करणं बंद करतं, ते फक्त मनाने विचार करतात. 90च्या दशकात दोन अभिनेत्रीचं वागणं हेच दाखवतं. या काळात अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या पण रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांची बातच वेगळी होती. असं सांगितलं जातं की, दोन्ही अभिनेत्रीचं मन एकाच अभिनेत्यावर जडलं होतं. नंतर जे झालं त्याच्या बातम्या झाल्या.
अजय देवगनच्या डेब्यूनंतर रवीना टंडनने बॉलिवूडमध्ये पाउल ठेवलं. लोकांना ही जोडी खूप आवडली. पडद्यावरील प्रेम कधी खऱ्या आयुष्यात आलं काहीच समजलं नाही. बघता बघता फिल्मी मॅगझीनमध्ये दोघांच्या अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती. यानंतर जीगर सिनेमात अजयसोबत करिश्मा कपूर दिसली. लोकांना ही जोडीही खूप आवडली. मीडियात नंतर करिश्मा कपूर आणि अजयच्या प्रेमाची चर्चा रंगली. चर्चा झाली की, दोघांमध्ये काहीना काही सुरू आहे. असं सांगितलं जातं की, त्यावेळी सेटवर दोघे तासंतास गप्पा करत होते. शूटींगनंतरही फोनवर बोलत होते. हळूहळू ही खबर रवीनाच्या कानावर गेली.
असं सांगितलं जातं की, अजय देवगनवरून त्यावेळी या दोन अभिनेत्रीमध्ये युद्ध पेटलं होतं. ज्याचे साक्षीदार अनेक लोक होते. ज्यावेळी ही चर्चा सुरू होती तेव्हा करिश्मा आणि रवीना एका सिनेमात काम करत होत्या. एका गाण्याचं शूटींग त्यांना सोबत करायचं होतं. कोल्ड वॉर सुरूच होतं. दोघी एकमेकींसोबत बोलतही नव्हत्या. पण तेव्हाच गाण्याच्या शूटींग दरम्यान असं काही झालं की, करिश्मा आणि रवीनाचं भांडण सुरू झालं. दोघींनी एकमेकींचे केस ओढले. सगळ्या लोकांसमोर त्यांचं भांडण झालं होतं.
आश्चर्याची बाब म्हणजे रवीना आणि करिश्मा ज्याच्यासाठी भांडल्या तो दुसऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला. काजोलसोबत काम करताना तो तिच्या प्रेमात पडला. 1999 मध्ये काजोलसोबत त्याने लग्न केलं.