Join us

जेव्हा कियारा आडवाणीला फोनवर बॉयफ्रेंडसोबत बोलताना आईने पकडले होते रंगेहाथ, मग घडले असे काही

By तेजल गावडे | Published: November 04, 2020 1:02 PM

अभिनेत्री कियारा आडवाणी लवकरच लक्ष्मी चित्रपटात झळकणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी लवकरच लक्ष्मी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. कियारा बऱ्याचदा तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असते. असे म्हटले जात आहे की, कियारा सध्या सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत आहे. मात्र कियारा आणि सिद्धार्थ फ्रेंड्स असल्याचं सांगतात. कियाराचा प्रेमावर खूप विश्वास आहे आणि अशी कोणती गोष्ट आहे जी ती रिलेशनशीपमध्ये सहन करू शकत नाही.

खरेतर एका मुलाखतीत कियाराने सांगितले होते की, मी १०वी क्लासमध्ये होती तेव्हा पहिल्यांदा रिलेशनशीपमध्ये होते. तेव्हा माझ्या आईने मला फोनवर बोलताना रंगेहाथ पकडले होते. तेव्हा आई म्हणाली होती की, तुझी बोर्ड परीक्षा जवळ येत आहे आणि तुझे पुर्ण लक्ष अभ्यासाकडे केंद्रीत कर.

त्यावेळी कियाराने हेदेखील सांगितले होते की माझ्या आई वडिलांचे लव्ह मॅरीज झाले आहे आणि दोघे एकमेकांचे गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड होते. त्यामुळे आम्ही घरात खूप प्रेमळ वातावरण पाहिले आहे. तर मी ज्याला डेट करत होते तेव्हा मी विचार करत होते की मी लग्न याच्यासोबतच करणार. माझा प्रेम आणि लग्न यावर विश्वास आहे.

कियाराला जेव्हा विचारले की, तू रिलेशनशीपमध्ये कोणती गोष्ट सहन करू शकत नाही? तर अभिनेत्री म्हणाली होती की, मी कोणत्याही प्रकारचा दुर्व्यवहार सहन करू शकत नाही.

कियारा आणि अक्षयचा लक्ष्मी चित्रपट ९ नोव्हेंबरला डिस्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेंसने केले आहे. हा तमीळ सुपरहिट चित्रपट मुनी २चा हिंदी रिमेक आहे.

टॅग्स :कियारा अडवाणीअक्षय कुमार