Join us

लता मंगेशकर यांनी दिला होता राणू मंडलला मोलाचा सल्ला, ऐकले असते तर आजही असती यशशिखरावर

By सुवर्णा जैन | Published: September 28, 2020 5:00 PM

जेव्हा राणू मंडल प्रकाशझोतात आली होती. तेव्हा हिमेश रेशमियाने तिला गाणं गाण्याची संधी दिली. यानंतर तिने प्रसिद्धीत राहून खूप सहानुभूतीही मिळवली. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार राणूच्या आवाजाचे कौतुक करायचे.

''एक प्यार का नगमा हे'' गाणं गात राणू  मंडल स्टार बनल्या.कधी भीक मागताना गाणं गाणारी व्यक्ती थेट बॉलीवूडमध्ये पोहोचू शकेल हा विचार राणूनं स्वप्नातही केला नसेल. लॉकडाउनदरम्यान राणू मंडलचे काही फोटोज समोर आले आहेत. त्यात ती लोकांना दिलासा देताना दिसली होती. सोशल मीडियावर सर्वात आधी राणूचा परिचय करणाऱ्या अतींद्र चक्रवर्तीने सांगितले की, काही गरीब लोकांना राणू मंडलच्या घरी घेऊन गेली होती. राणूने असहाय्य लोकांसाठी गरजेचे सामानही विकत घेतले ज्यात तांदूळ, डाळ आणि अंड्याचा समावेश होता. पण लॉकडाउन एवढे मोठा चालेल याचा अंदाज नव्हता पण इतरांना मदत करण्यासाठी पुढे आलेली राणूनचीच परिस्थिती दयनीय झाली आहे.

 

ज्या पद्धतीने रानू एका रात्रीत लोकप्रिय झाली आणि काही तासातच यशाच्या शिखरावर पोहचली. त्यानंतर चाहत्यांसोबत उद्धटपणे वागणे राणूला  चांगलंच भोवले आहे. तिची लोकप्रियता इतकी होती की, तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमा होत होती पण तिला हे सर्व हाताळता आले नाही. चाहत्यांसोबत गैरवर्तन, मीडियाच्या प्रतिनिधांना उलट उत्तरं देणं यासर्वामुळं तिचे जूने दिवस परत आले आहेत अशी चर्चा आहे.

जेव्हा राणू मंडल प्रकाशझोतात आली होती. तेव्हा हिमेश रेशमियाने तिला गाणं गाण्याची संधी दिली. यानंतर तिने प्रसिद्धीत राहून खूप सहानुभूतीही मिळवली. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार राणूच्या आवाजाचे कौतुक करायचे. लता मंगेशकर यांनीही राणूचे कौतुक केले होते. मात्र त्याचवेळी एक मोलाचा सल्लाही दिला होता. इतरांचे अनुकरण करत मिळवलेले यश हे क्षणिक असते. ते फार काळ टिकत नाही. तसेच  रिअॅलिटी शो आणि सोशल मीडियामुळे अनेकांना व्यासपीठ मिळत आहे. मात्र स्वतःच्या कला कौशल्य दाखवा, इतरांची कॉपी करू नका असाही सल्ला लता मंगेशकर या शोमध्ये सहभागी होणा-या स्पर्धकांना देत असतात.  

टॅग्स :लता मंगेशकरराणू मंडल