जेव्हा लता मंगेशकर यांना अटारी बॉर्डरवर रोखण्यात आलं होतं, भावूक होऊन रडू लागल्या होत्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 02:55 PM2022-02-08T14:55:56+5:302022-02-08T14:56:49+5:30
Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांनी जेव्हा सिनेमात गाणं सुरू केलं होतं तेव्हा त्या नूरजहांने फार प्रभावित होत्या. नूरजहां यांनीही लता दीदीच्या गायकीचं कौतुक केलं होतं.
लता मंगेशकर Lata Mangeshkar) अशा गायिका होत्या की, त्यांच्या निधनावर केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही दु:खं व्यक्त केलं जात आहे. स्वरकोकिळ लता मंगेशकर यांच्याबाबतच्या अनेक गोष्टी अनेक किस्से सांगितले जात आहेत. साधऱण ७ दशकाच्या आपल्या गायकीच्या या प्रवास त्यांच्या कितीतरी आठवणी होत्या. अशीच एक त्यांची आठवण सांगणार आहोत. लता दीदी आपल्या आदर्श गायिका नूरजहां (Noor Jehan) यांना भेटण्यासाठी अटारी बॉर्डरवर गेल्या होत्या, पण त्यांना रोखण्यात आलं होतं.
लता मंगेशकर यांनी जेव्हा सिनेमात गाणं सुरू केलं होतं तेव्हा त्या नूरजहांने फार प्रभावित होत्या. नूरजहां यांनीही लता दीदीच्या गायकीचं कौतुक केलं होतं. सोबतच त्यांनी दीदीला पुढे जाण्यासही मदत केली होती. लता मंगेशकर यांच्या जीवनात ज्यांना विशेष स्थान होतं त्यातील एक नूरजहांही होत्या.
लता मंगेशकर यांना अटारी बॉर्डरवर रोखलं होतं
देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण नूरजहां यांना आपली कर्मभूमी मुंबई सोडून पाकिस्तानात जावं लागलं होतं. पण दोघींच्या मैत्रीत सीमा कधीच आडवी आली नाही. भास्करच्या एका रिपोर्टनुसार, संगीत प्रेमी नरेश जोहर यांनी सांगितलं की, '१९५१ मध्ये लताजी आणि नूरजहां यांच्या डुएट सॉंगसाठी प्रसिद्ध संगीतकार सी रामचंद्र लता दीदींना घेऊन अटारी बॉर्डरवर गेले होते. पण त्यांच्याकडे एक समस्या होती की, त्यांच्याकडे विसा आणि पासपोर्ट नव्हता. त्यामुळे त्यांना बॉर्डरवरच रोखण्यात आलं. तेव्हा सी. रामचंद्र यांच्या माध्यमातून लता यांचं नूरजहांसोबत बोलणं झालं. पण दोघींना भेटायचं होतं. मग असं ठरलं की, नूरजहां यांनीही बॉर्डरवर यावं'.
लता दीदी आणि नूरजहां रडल्या
सी रामचंद्र यांनी आपल्या बायोग्राफीमध्ये लिहिलं की, 'लता मंगेशकर आणि नूरजहां एकमेकींच्या भेटीसाठी बॉर्डरवर पोहोचल्या. दोघीही एकमेकींना बघून भावूक झाल्या. नंतर दोघीही रडू लागल्या होत्या'. लता आणि नूरजहां यांच्या या प्रेमाचा पुरावा तिथे उपस्थित लोकांसोबत नूरजहां यांचे पतीही होते.