बॉलिवूडची अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सध्या छोट्या पडद्यावरही झळकताना दिसत आहे. तिनं आपल्या चित्रपटांमधून अभिनयाच्या माध्यमातून अनेकांची मनं जिंकली. काही वर्षांपूर्वी डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) यांच्यासोबत तिचा विवाह झाला आणि त्यानंतर अभिनय क्षेत्राला रामराम ठोकत ती अमेरिकेत स्थायिक झाली. त्यांच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीच्यानिमित्तानं (Wedding Anniversary) रिसेप्शनशी निगडित एक किस्सा पाहा.
माधुरी दीक्षितच्या स्टारडमबाबत श्रीराम नेने यांना फारशी कल्पना नव्हते. दोघांची पहिली भेट त्यांच्या भावाच्या घरी झाली. दोघंही विवाह बंधनात अडकण्यापूर्वी काही वेळासाठी एकमेकांना डेटही करत होते. डॉ. नेनेंनी आपला कोणताही चित्रपट पाहिला नव्हता, असं तिनं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. "मी आणि त्यांच्या आईनं त्यांना माझा चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न केला. गाणी दाखवण्याचाही प्रयत्न केला. परंतु त्यावर आपण काहीतरी दुसरं करू बाहेर फिरु," असं त्यांनी सांगितल्याचं माधुरी म्हणाली होती. माधुरीनं सिमी ग्रेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत याचा उलगडा केला होता.
कोणालाही ओळखलं नव्हतं"आमच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये त्यांनी चित्रपट क्षेत्रातील कोणत्याही स्टार्सना ओळखता आलं नव्हतं. त्यांनी केवळ एकाच अभिनेत्याला ओळखलं होतं आणि ते म्हणजे अमिताभ बच्चन. आपल्या शाळेच्या दिवसांमध्ये त्यांनी अमर अकबर अँथनी हा चित्रपट पाहिला होता. मी या चेहऱ्याला ओळखतो असं त्यांनी मला सांगितलं. त्यांचा चित्रपट पाहिल्यामुळे तुम्ही त्यांना ओळखता असं सांगितलं," असा खुलासा माधुरीनं मुलाखतीदरम्यान केला.
माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांना दोन मुलं आहेत. आरिन आणि रयान अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. आरिननं याच वर्षी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तर रयान १६ वर्षांचा आहे. वर्कफ्रन्टबद्दल सांगायचं झालं तर माधुरी दीक्षित नुकतीच डान्स रिअॅलिटी शो डान्स दिवाने ३ मध्ये दिसली गोती. आता लवकरच ती डिजिटल डेब्यूही करणार आहे. फाईंडिंग अनामिका असं तिच्या सीरिजचं नाव असून ती नेटफ्लिक्सवर रिलिज होणार आहे.