बॉलिवूडमध्ये कधीकाळी ‘काऊबॉय’ नावाने ओळखले जाणारे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात फिरोज खान (Feroz Khan)आज आपल्यात नाहीत. (27 एप्रिल 2009 साली फिरोज खान यांचे कॅन्सरने निधन झाले.) पण त्यांचे किस्से आजही इंडस्ट्रीत ऐकवले जातात. 25 सप्टेंबर 1939 रोजी बंगळुरु येथे जन्मलेले फिरोज खान यांच्या खासगी आयुष्याला वादाची किनार राहिली आहे. पण फिरोज खान यांनी कधीही त्याची पर्वा केली नाही. ते जगले ते त्यांच्या अटीवर.फिरोज आणि माधुरी दीक्षित यांच्यातील एक वाद त्याकाळी बराच गाजला होता. होय, आज हाच किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा किस्सा आहे, ‘दयावान’ (Dayavan) या चित्रपटादरम्यानचा. फिरोज खान यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. यात माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि विनोद खन्ना (Vinod Khanna) मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील माधुरी व विनोद खन्ना यांच्यावर चित्रीत हॉट किसींग सीन्सची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली होती.
खरे तर माधुरीने कायम स्वत:ला वादांपासून दूर ठेवले. पण विनोद खन्नांसोबतच्या हॉट किसींग सीन्समुळे ती चांगलीच वादात सापडली होती. त्यावेळी माधुरीचे वय होते 21 तर विनोद खन्ना होते 42 वर्षांचे. या दोघांनाही चित्रपटात काही इंटीमेट, बोल्ड सीन्स असणार आहेत हे माधुरी आणि विनोद खन्ना यांना आधीच माहित होते. पण शूटींगचा दिवस उजाडला आणि माधुरी अतिशय नर्व्हस झाली. फिरोज खान यांनी कशीबशी तिची समजूत काढली आणि शूट सुरु झाले. पण एका लिप लॉक शॉटवेळी विनोद खन्ना यांचा स्वत:वरील ताबा सुटला.
ते आवेशाने माधुरीला किस करू लागले, इतके की, त्यांनी चक्क माधुरीचा ओठांचा चावा घेतला. या सीन्सवरून प्रचंड खळबळ माजली. माधुरीलाही हे सीन्स दिल्याचा पश्चाताप झाला आणि तिने दिग्दर्शक फिरोज खान यांना हे किसींग सीन्स चित्रपटातून काढून टाकण्यासाठी नोटीस बजावली. अर्थातच या कायदेशीर नोटीसचा फिरोज खान यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही.
फिरोज खान यांनी हे किसींग सीन्स हटवण्यास स्पष्ट नकार दिला. या सीन्ससाठी मी तुम्हाला 1 कोटी रुपये मानधन दिले आहे. हिरोईनला इतके पैसे कोण देतो? हे सीन्स हटणार नाहीत. मुळीच हटणार नाहीत, असे फिरोज यांनी माधुरीला स्पष्टपणे बजावले. माधुरी यावर काय बोलणार? अखेर चित्रपट प्रदर्शित झाला आणि सर्वत्र या किसिंग सीनचीच चर्चा रंगू लागली. याबाबत माधुरीला आजही पश्चाताप होतो. आपण त्या चित्रपटासाठी होकार द्यायला नको होते असे आजही ती म्हणते.