Join us

संतापजनक ! आपल्याच मुलीसोबतच लग्न करण्याची होती महेश भट यांची इच्छा, सार्वजनिक ठिकाणीच केले होते धक्कादायक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 2:01 PM

महेश भट्ट यांचं परवीन बॉबी यांच्याशी असलेलं अफेअर. मात्र परवीन यांच्या आजारपणामुळे महेश तिच्यापासून वेगळे झाले. आणि आपल्या पत्नीकडे परत आले.

प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक महेश भट्ट सध्या खूप चर्चेत आहेत. सोशल मीडियावर सुशांतच्या निधनानंतर खूप रागही व्यक्त होत आहे. मुळात महेश भट्ट यांचे भाऊ मुकेश भट्ट यांना सुशांत असे काही तरी पाऊल उचलेल याची आधीच जाणीव असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्यावर सुशांतचे चाहते भडकले आहेत. तसेच महेश भट्ट यांचे जुने वादही पुन्हा समोर येत आहेत.

त्यातला एक वाद म्हणजे महेश भट्ट यांनी मुलीलाच चुंबन करताने फोटो आजही सा-यांच्या लक्षात आहे. या फोटोवर स्पष्टीकरण देण्यासाठी भट्ट यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांना अनेक उलट सुलट प्रश्न विचारण्यात आले होते. उत्तर देताना भट्ट यांची जीभ घसरली आणि नको ते बोलुन बसले.

''पुजा भट्ट मुलगी नसती, तर मी तिच्याबरोबर लग्नही केले असते''. असे विधान करताच भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या. या विधानानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर प्रचंड टीकेची झोड उठली होती. भारतीय संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम भट्ट करत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.

महेश भट यांनी २० व्या वर्षीच लॉरेन ब्राइटशी लग्न केल होतं. लग्नानंतर काही दिवसांनी लॉरेननं आपलं नाव बदलून किरण भट असं केलं. या दोघांना २ मुलं आहेत. पुजा आणि राहुल. मात्र लॉरेन आणि महेश यांचं हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. याला कारण होतं महेश यांचं परवीन बॉबी यांच्याशी असलेलं अफेअर. मात्र परवीन यांच्या आजारपणामुळे महेश तिच्यापासून वेगळे झाले. आणि आपल्या पत्नीकडे परत आले.

सोनी राजदान यांच्यापासून महेश यांना २ मुली आहेत. आलिया आणि शाहिन. आलियानं आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये स्थान मिळवलं आहे. महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांच्या फोटोवर उठलेल्या वादळाला बरेच वर्ष लोटले असले तरी आजही तो फोटो आठवताच संतप्त प्रतिक्रीया उठतातच.        किरण यांच्याकडे परतल्यानंतरही महेश आणि किरण यांच्या नात्यातील कटुता कमी झाली नाही. ज्यामुळे १९८६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला आणि सोनी राजदान यांच्याशी दुसरं लग्न केल.

टॅग्स :महेश भटपूजा भट