अभिनेत्री महिमा चौधरी आज बॉलिवूडमध्ये गायब झाली आहे. शाहरूख खानसोबत ‘परदेस’ सिनेमातून तिने डेब्यू केला होता. 2016 मध्ये प्रदर्शित झालेला ‘डार्क चॉकलेट’ हा तिचा अखेरचा सिनेमा. त्यानंतर ती कुठल्याच सिनेमात झळकली नाही. महिमाचा डेब्यू सिनेमा खरे तर हिट होता. पण तरीही तिचे फिल्मी करिअर फार चालले नाही. 1999मध्ये आलेल्या 'दिल क्या करे' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान महिमा एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावली होती. याचा खुलासा अभिनेत्रीने स्वत: केला आहे.
बॉलिवूड बबल या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत महिमाने या भीषण अपघाताबद्दल सांगितले. महिमा अजय देवगण व काजोलसोबत ‘दिल क्या करे’चे शूटींग करत होती. याचदरम्यान हा भीषण अपघात घडला होता. बेंगळुरूमध्ये स्टुडिओकडे निघाली असताना तिच्या कारला ट्रकने धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की, कारच्या काचेचे अनेक तुकडे महिमाच्या चेह-यावर रतून पडले होते.
या अपघातातून महिमा चौधरी बरी झाली तेव्हा नीना लुल्लाने मला ‘प्यार कोई खेल नहीं’ या चित्रपटात एक गाणे दिले. अक्षय कुमारने तिला ‘धडकन’मध्ये संधी दिली. त्याकाळात मी लपतछपत वावरत होते, या कठीण काळात कुटुंबीयांनी फार मदत केल्याचेही तिने सांगितले. तर मी़डियातले काहीजण तिची थट्टा करु लागले. त्यावेळी तिचे सहकारी कलाकार आणि निर्माते अजय देवगन आणि काजोल यांनी तिला भक्कम आधार दिला होता.