विधु विनोद चोप्रा हे ‘करीब’ सिनेमासाठी एक नव्या चेह-याच्या शोधात होते. निरागस चेह-याच्या नेहाला बघितल्यानंतर त्यांचा हा शोध थांबला. नेहाने ‘करीब’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर होगी प्यार की जीत, फिजा, राहुल, आत्मा अशा चित्रपटात ती दिसली. पण तिला जम बसवता आला नाही. ही नेहा कोण तर पूर्वाश्रमीच शबाना रजा (Shabana). तिची आणखी एक ओळख द्यायची झाल्यास बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता मनोज वाजपेयीची (Manoj Bajpayee) पत्नी. एप्रिल २००६ मध्ये तिने अभिनेता मनोज वाजपेयीसोबत लग्न केले. यानंतर चित्रपटांना तिने कायमचा रामराम ठोकला आणि संसारात रमली.
मनोज वाजपेयीसोबत नेहा अनेकदा फिल्मी पार्ट्यांमध्ये हजेरी लावते. नेहाचे खरे नाव शबाना रजा आहे. एकेकाळी नेहा बॉलिवूडची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. पण चित्रपटांत येण्यासाठी असे काही झाले की, ती खूश नव्हती. आता का? तर त्यासाठी तुम्हाला पुढची बातमी वाचावी लागेल.तर नेहा चित्रपटसृष्टीत आली, तेव्हा तिला तिचे नाव बदलण्याची मुळीच इच्छा नव्हती. एका मुलाखतीत तिने याचा खुलासा केला होता. माझ्या आईवडिलांनी मोठ्या प्रेमाने माझे नाव शबाना ठेवले होते. पण चित्रपटात आल्यानंतर नाव बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला आणि मला माझे नाव बदलावे लागले,असे तिने सांगितले होते. नाव बदलण्याची काहीही गरज नव्हती. पण चित्रपटांत येताच नाव का बदलावे लागते, ही गोष्ट माझ्या समजण्यापलीकडची आहे, असे तिने म्हटले होते.
बॉलिवूड डेब्यू करताना दबावापोटी शबानाची नेहा झाली. पण पुढे नाव बदलण्याची गोष्ट तिला सतावू लागली. लोकांच्या दबावापोटी मी माझे नाव का बदलावे? असा प्रश्न तिला पडला. पुढे संजय गुप्ताच्या ‘अलीबाग’ या सिनेमासाठी तिने शबाना हे खरे नाव वापरले. मी माझ्या खºया नावासोबत काम करू इच्छिते असे तिने संजय गुप्तांना यावेळी ठणकावून सांगितले आणि ते त्यासाठी तयार झालेत.
लग्नापूर्वी सुमारे सात वर्षे नेहा आणि मनोज रिलेशनशिपमध्ये होते. नेहा आणि मनोजला एक मुलगी असून तिचं नाव नैला आहे. बॉलिवूडला रामराम केल्यानंतर नेहा अनेकवेळा सिनेमांच्या स्पेशल स्क्रिनिंगला पती मनोजसोबत दिसते. तसेच मनोजच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर देखील आपल्याला नेहा आणि नैला यांचे फोटो पाहायला मिळतात.