Join us

पीयूष मिश्रा यांनी नाकारल्यावर सलमानला मिळाला होता ‘मैंने प्यार किया’, कमाल आहे किस्सा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 1:21 PM

सलमान खान आणि सूरज बड़जात्या (Sooraj Badjatya) यांचा ऑल टाइम हिट सिनेमा ‘मैंने प्यार किया’ (Maine Pyar Kiya) नाकारला होता. नंतर हा सिनेमा सलमान खान याला मिळाला. नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला.

एखाद्या हिरोच्या हातातून सिनेमा जाणं आणि दुसऱ्याला काम मिळणं ही बॉलिवूडमध्ये सामान्य बाब आहे. पण एखाद्याने एक सिनेमा नाकारला आणि तो नंतर सुपर-डुपर हिट ठरला तेव्हा त्याला किती वाईट वाटू शकतं याचा अंदाज लावला जाऊ शकतो. असंच काहीसं गॅंग्स ऑफ वासेपूरमधील अभिनेते पीयुष​ मिश्रा (Piyush Mishra) यांच्यासोबत झालं. त्यांनी सलमान खान आणि सूरज बड़जात्या (Sooraj Badjatya) यांचा ऑल टाइम हिट सिनेमा ‘मैंने प्यार किया’ (Maine Pyar Kiya) नाकारला होता. नंतर हा सिनेमा सलमान खान याला मिळाला. नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला.

सूरज बड़जात्या यांनी 1989 मध्ये सलमान खान आणि भाग्यश्री (Bhagyshree) यांना घेऊन ‘मैंने प्यार किया’ सिनेमा केला होता. हा सिनेमा चांगलाच हिट झाला होता. यातील गाणीही हिट झाली होती. यातून सलमान खान सुपरस्टार झाला होता. पण सलमान खान या सिनेमाची पहिली पसंत नव्हता. तो होता पीयूष मिश्रा. 

पीयूष मिश्रा यांनी मुलाखतीत सांगितलं की, जेव्हा ते एनएसडीमध्ये होते तेव्हा त्यांना ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं. यावेळी एनएसडीच्या डायरेक्टरसोबत एक व्यक्ती बसले होते. त्यांची ओळख करून दिली गेली. त्यांनी सांगितलं की, ते त्यांचा सिनेमा ‘मैंने प्यार किया’साठी हिरोचा शोध घेत आहेत. हिरोईन फायनल झाली आहे ते हिरोचा शोध घेत होते. तेव्हा त्या व्यक्तीने विचारलं की, कॉलेज संपायला किती वेळ आहे? यावर पीयूष म्हणाले की, दोन महिने. तेव्हा या व्यक्ती आपलं कार्ड दिलं आणि सांगितलं की, दोन महिन्यांनी मुंबईला येऊन भेट.

पीयूष यानंतर पुन्हा आपल्या कॉलेज लाइफमध्ये बिझी झाले. तेव्हा पुन्हा एनएसडीचे डायरेक्ट महिर्षि यांनी त्यांना पुन्हा भेटण्यास बोलवलं आणि म्हणाले की, 'तू मुंबईला केव्हा जात आहे. लगेच जा. यासाठी कॉलेज सोडायला लागलं तरी चालेल'. पीयूष यांनी ते ऐकलं पण त्यावर फार लक्ष दिलं नाही. पीयूष नंतर मुंबईला गेले पण तीन वर्षानंतर तोपर्यंत सिनेमा तयार झाला होता. सलमान खान सुपरस्टार बनला होता.

टॅग्स :बॉलिवूडसलमान खान