जेव्हा करिनाचा शहजादा तैमूर अन् तुषारचा लाडका लक्ष्य एकमेकांना भेटतात तेव्हा...!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2017 2:54 PM
काल अभिनेता तुषार कपूर याचा लाडका लक्ष्य याचा पहिला वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. लक्ष्यच्या बर्थडे पार्टीत त्याचे बरेचसे ...
काल अभिनेता तुषार कपूर याचा लाडका लक्ष्य याचा पहिला वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. लक्ष्यच्या बर्थडे पार्टीत त्याचे बरेचसे चिमुकले दोस्त आले होते. मात्र सर्वाधिक चर्चेत राहिला तो करिना कपूर-खानचा शहजादा तैमूर. होय, जेव्हा तैमूर अन् लक्ष्य एकमेकांसमोर आले तेव्हा त्यांच्यातील एकमेकांप्रतीची ओढ बघून सगळेच दंग राहिले. आगामी काळात बॉलिवूडमध्ये हे दोघे एकमेकांचे जीवलग मित्र तर बनणार नाहीत ना? असेच काहीसे चित्र दिसत होते. वास्तविक जेव्हा करिना आपल्या लाडक्या तैमूरला घेऊन तुषारच्या घरी आली तेव्हा सगळ्यांनाच तैमूर अन् लक्ष्यचा सामना कसा झाला असेल याविषयी उत्सुकता लागली होती. याचाच उलगडा करण्यासाठी जेव्हा लक्ष्यचे पप्पा तुषार कपूर याला विचारण्यात आले तेव्हा त्याने दिलेली माहिती थक्क करणारी होती. तुषारने म्हटले की, ‘काल ते दोघे एकमेकांना भेटले. जेव्हा त्यांनी एकमेकांना बघितले तेव्हा ते बघतच राहिले. दोघांचे हावभाव बघून सगळेच चकीत झाले होते. वास्तविक त्यांना चांगले मित्र बनण्यासाठी आणखी वेळ द्यायला हवा. परंतु माझ्या मते त्यांच्यातील मैत्रीची ही एक चांगली सुरुवात आहे. यावेळी तुषारने बोलताना असेही म्हटले की, आगामी काळातही आम्ही असा प्लॅन करणार आहोत, जेणेकरून हे दोघे एकमेकांना भेटू शकतील. मला खात्री आहे की, आगामी काळात तैमूर आणि लक्ष्य खूप चांगले मित्र बनतील. तुषारने दिलेली ही माहिती खरोखरच उत्सुकता वाढविणारी असून, आगामी काळात हे दोघे भेटत राहिल्यास त्यांच्यात नक्कीच चांगली मैत्री निर्माण होईल. आता मुलांविषयीच बोलायचे झाल्यास निर्माता करण जोहर याच्या मुलांविषयीदेखील प्रचंड उत्सुकता आहे. या दोघांनी अजूनही तुषारच्या मुलाची भेट घेतली नाही. जेव्हा हे मुले तुषार, करिनाच्या मुलाची भेट घेतील, तेव्हा त्यांच्यातही चांगलीच गट्टी निर्माण होईल यात शंका नाही. असो, चाहत्यांची एकच अपेक्षा असेल की, तैमुर, लक्ष्य, यश आणि रुही यांनी एकदा तरी एकत्र यायला हवे.