Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं लग्न लवकरच होणार आहे. भट्ट आणि कपूर परिवारातील लोक लग्नाच्या तयारीत बिझी आहेत. अशात आलिया आणि रणबीरबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. अनेकांना हे माहीत आहे की, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आलिया आणि रणबीर एकमेकांना डेट करत आहेत. पण हे कुणाला माहीत नसेल की, दोघांचं अफेअर कोणत्या तारखेला आणि कुठे? सुरू झालं.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट कपलपैकी एक आहे. दोघेही नेहमीच सोबत दिसतात. दोघेही ब्रम्हास्त्र सिनेमात एकत्र दिसणार आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे दोघांचं लग्न होत आहे. यादरम्यान दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यातीलच एका व्हिडीओत रणबीर कपूर स्वत: सांगत आहे की, त्याचं आणि आलियाचं नातं कोणत्या तारखेला आणि कोणत्या ठिकाणी सुरू झालं होतं.
ब्रम्हास्त्रच्या प्रमोशनल इव्हेंट दरम्यान रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टेजवर बोलत होते. दोघेही इव्हेंटमध्ये सहभागी फॅन्सच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. आलियाने रणबीरला विचारलं की, 'पहिला दिवस जेव्हा आपण ब्रम्हास्त्रवर काम करणं सुरू केलं होतं, तो दिवस कोणता होता?'. यावर रणबीरने आलियाच्या प्रश्नाला बगल देत, 'पहिल्या दिवशी आपलं सुरू झालं होतं?'. यावर आलिया लाजताना दिसली.
यानंतर रणबीर सांगतो की, '२०१७, १ जानेवारी इस्त्राइल टेल अवीव. आणि मला आठवतं दुसऱ्या दिवशी आलिया इन्स्टाग्रामवर एक फोटोही शेअऱ केला होता. ज्यात ती ब्लॅंक गंजी आणि लेदर जॅकेटमध्ये दिसली होती. हे मला माहीत आहे. कारण तो फोटो शेअर करण्याच्या १५ मिनिटांआधी तिने मला तो फोटो सेंड केला होता'.
आलिया आणि रणबीरच्या नात्याला आता बरीच वर्ष झाली असून दोघेही १५ एप्रिलला लग्न बंधनात अडकणार आहेत. रणबीर आणि आलियाचा परिवार या नात्याने आनंदी आहेत. असं सांगितलं जात आहे की, लग्न रणबीर कपूरच्या वांद्रे येथील घरी होणार आहे. लग्नात शाहरूख खान, झोया अख्तर, अयान मुखर्जी, संजय लीला भन्सालीसह काही सेलिब्रिटी हजर असणार आहेत.