सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर सर्वाधिक कोण ट्रोल झाले असेल तर अभिनेत्री रिया चक्रवर्ती. रियाला या प्रकरणात सर्वाधिक ट्रोल केले गेले. सुशांतच्या चाहत्यांनी तिला नको त्या भाषेत ट्रोल केल, अगदी तिला विषकन्या ठरवण्यापासून काय काय म्हटले.30 वर्षांपूर्वी अगदी हेच काहीप्रमाणात अभिनेत्री रेखा यांच्या वाट्याला आले होते, त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. पण रेखा यांच्या तरीही याच पद्धतीने ट्रोल केले गेले होते. कारण होते, रेखा यांच्या पतीचा मृत्यू. 30 वर्षांपूर्वी रेखा यांचे पती मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर रेखा यांच्यावर सासरच्यांनी प्रचंड टीका केली होती.
सिंगर चिन्मयी श्रीपदा हिने ट्विटरवर याबद्दल एक पोस्ट केली आहे. यात तिने रेखा व रिया यांची तुलना केली आहे, आज रियासोबत जे काही घडतेय, तेच 1990 साली रेखा यांच्यासोबत वाट्याला आले होते, याकडे चिन्मयीने या पोस्टमध्ये म्हटले आहे. याचा आधार म्हणून चिन्मयीने रेखा यांची बायोग्राफी ‘रेखा- द अनटोल्ड स्टोरी’मधील काही उतारे शेअर केले आहेत. यासर उस्मान यांनी रेखा यांची ही बायोग्राफी लिहिली आहे. या बायोग्राफीचा हवाला देत चिन्मयीने संबंधित पोस्ट केली आहे.
चिन्मयीची पोस्ट...
‘2 ऑक्टोबर1990 रोजी रेखा यांचे पती मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या केली. पत्नी रेखाच्या ओढणीने गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले. यानंतर रेखांना लोकांच्या संतापाचा सामना करावा लागला. मुकेश यांची आईनेही ‘वो डायन मेरे बेटे को खा गाई, भगवान उसे कभी माफ नहीं करेगा,’ असे रडत रडत म्हटले होते. मुकेश यांच्या भावानेही रेखा यांच्यावर प्रचंड टीका केली होती. माझा भाऊ रेखावर प्रचंड प्रेम करायचा. प्रेमासाठी तो मरायलाही तयार झाला. रेखा त्याच्यासोबत जे काही करत होती, ते तो सहन करू शकला नाही़.आता तिला काय हवे, आता तिला आमचा पैसा हवा का?’, मुकेश यांच्या भावाने म्हटले आहे.पतीच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेकांनीही रेखा यांच्यावर टीका केली होती. सुभाष घई, अनुपम खेर यांनीही रेखा यांना लक्ष्य केले होते. ‘रेखा यांनी चित्रपटसृष्टीच्या चेह-यावर असा काही काळीमा फासला की, तो मिटवणे शक्य नाही. आता कोणताच दिग्दर्शक त्यांच्यासोबत काम करणार नाही. प्रेक्षक त्यांना भारतीय महिला वा न्यायाची देवी म्हणून कसे स्वीकारू शकतील?’अशी प्रतिक्रिया सुभाष घई यांनी दिली होती.
‘सिलसिला’ पाहून भडकले होते अमिताभ बच्चन, काय होते कारण?
तिरूपती मंदिरात बांधली होती लग्नगाठबायोग्राफीत रेखा यांच्या जीनवप्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकानुसार, मुकेश आणि रेखा यांनी तिरुपती मंदिरात पुन्हा लग्नगाठ बांधली होती. रेखा यांचे आईवडिल या विवाहसोहळ्याला हजर होते. पुढे मुकेश यांना व्यवसायात तोटा झाला. ज्यानंतर रेखा व मुकेश यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला.
लग्नाच्या जवळपास सहा महिन्यानंतरच रेखा यांनी मुकेश यांच्याकडे घटस्फोटाची कागदपत्र पाठवली होती. मुख्य म्हणजे त्यांनी यापूर्वी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. अखेरीस मुकेश यांनी फार्महाऊसवरच रेखा यांच्या ओढणीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. मुकेश यांच्या आत्महत्येनंतर रेखा यांचा शेषनाग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा रेखा यांच्यावर बरीच टीका झाली. अनेकांनी त्यांच्या पोस्टवर काळंही फासल्याचेही म्हटले जाते.