Join us

कपूर घराण्याचा जावई होणार होता अजय देवगण? लग्नांच्या अफवांवर करिश्मा कपूर काय म्हणाली होती...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 1:14 PM

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांनी 1990 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.

 बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि अजय देवगण  (Ajay Devgn) यांनी 1990 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. दोघांनी 'जिगर', 'सुहाग', 'शक्तिमान'सह अनेक हिट चित्रपट दिले. त्यांना एकत्र पाहणेही प्रेक्षकांना आवडले. दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली, ऐवढंच काय तर  त्यांच्या लग्नाची चर्चाही मीडियात सुरू झाली. त्यावेळी असे बोलले जात होते की, अजय देवगण लवकरच कपूर कुटुंबाचा जावई होणार आहे.

या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी करिश्मा कपूरला स्वतः पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले. वास्तविक, एका मुलाखतीत जेव्हा करिश्मा कपूरला तिच्या आणि अजय देवगणच्या लग्नाबद्दल विचारण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेव्हा करिश्मा कपूरने सांगितले होते की माझ्यात आणि अजय देवगणमध्ये फक्त चांगली मैत्री आहे. अजय देवगणला करिश्मा कपूरसाठी काय वाटले, हे त्याने कधीच करिश्मा कपूरला सांगितले नाही, परंतु करिश्माने निश्चितपणे स्पष्ट केले की दोघांमधील प्रेमसंबंध शक्य नाही.

आम्ही फक्त चांगले मित्र आहोतकरिश्मा कपूर म्हणाली होती की, एकत्र अनेक चित्रपट करूनही ती अजूनही स्वत:ला लहान मुलगी समजते. अजय देवगण आणि करिश्मा कपूर यांच्यात नेहमीच चांगली मैत्री राहिली.  करिश्मा कपूर व्यतिरिक्त, अजय देवगणच्या लिंक अपच्या अफवा रवीना टंडनशी होत्या.

अजय देवगण-करिश्मा रिलेशनशिपमध्ये होते का?एक काळ असा होता की, रवीना टंडन आणि अजय देवगण मुलाखतींमध्ये एकमेकांविरुद्ध बोलायचे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, रवीना टंडनने अजय देवगणबद्दल सांगितले होते की, तो तिला आधी डेट करत होता, पण करिश्मा कपूरसाठी त्याने रवीना टंडनसोबत ब्रेकअप केले. विशेष म्हणजे अजय देवगणची करिश्मा कपूरसोबतची जोडी त्यावेळी हिट ठरली होती.

टॅग्स :अजय देवगणकरिश्मा कपूर