Join us

तेव्हा 16 वर्षांनंतर सैफ बोलला, लेकरांना सांगितली आईपासून वेगळी होण्याची वेदनादायी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 16:03 IST

सैफने 1991मध्ये 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंगशी लग्न केले होते.

80-90 च्या दशकात अनेक सिनेमांमध्ये दिसणारी अमृता सिंग वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. अमृताची सैफ अली खानबरोबर 'बेखुडी' सिनेमाच्या सेटवर पहिली भेट झाली होती. प्रेमात पडल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.  1991 मध्ये दोघांचे लग्न झाले आणि त्यानंतर सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांचा जन्म झाला, पण हे नातं फार काळ टिकू शकले नाही. 2004 मध्ये दोघे वेगळे झाले. अमृताशी असलेले नातं संपवण्याचा निर्णय आपल्या मुलांना सांगणं सैफसाठी कठीण होते.

अमृता सिंग आणि सैफ अली खान यांनी 2004मध्ये घटस्फोट झाला आणि ते विभक्त झाले. घटस्फोटाच्या 16 वर्षांनंतर, 2020 मध्ये सैफ अली खानने एका मुलाखतीत अमृतासोबत झालेल्या घटस्फोटाविषयी अनेक खुलासे केले. त्यांने या मुलाखतीत सांगितले होते की आपल्या मुलांना याविषयी सांगणे किती वेदनादायी होते.

अभिनेता म्हणाला की, ही जगातील सर्वात वाईट गोष्ट होती. मला असे वाटत नाही की मी कधीही ही गोष्ट निश्चित करण्यास सक्षम आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्या या प्रकरणात मला कधीही शांतता देणार नाहीत. सैफ पुढे म्हणाला की, आता गोष्टी बर्‍याच बदलल्या आहेत.

मॉडर्न फॅमिलीविषयी आपली मते मांडताना तो म्हणाले की, कोणत्याही मुलाला आपल्या कुटूंबापासून वेगळे करु नये. याचा मुलांवर वाईट परिणाम होतो. कधीकधी परिस्थिती भिन्न असते. पालक एकत्र नसतात किंवा बर्‍याच तक्रारी असतात. परंतु या सर्वांमध्ये मुलांना स्थिर वातावरण आणि घर असणे खूप महत्वाचे आहे.

सैफने 1991मध्ये 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंगशी लग्न केले. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोघांनाही दोन मुलं आहेत.. 2012मध्ये सैफने दहा वर्षांनी लहान असलेल्या करिना कपूरशी लग्न केले. दोघांच्या मुलाचे नाव तैमूर अली खान आहे लवकरच दोघांचं दुसरं बाळ जगात येणार आहे. 

 

टॅग्स :सैफ अली खान अमृता सिंग