Join us

'तुला आता रिटायर होण्याची गरज आहे'; 'गदर' पाहिल्यानंतर संजय लीला भन्साळींनी दिला अमिषाला सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 3:37 PM

Ameesha patel: 'कहो ना प्यार हैं' या सिनेमातून अमिषाने इंडस्ट्री पदार्पण केलं. विशेष म्हणजे तिचा पहिलाच सिनेमा सुपरहिट झाला. इतकंच नाही तर त्यानंतर ती झळकलेल्या 'गदर' या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

'कहो ना प्यार है', 'गदर', यांसारख्या सुपरहिट सिनेमातून इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल (Ameesha Patel). २०२३ मध्ये तिचा 'गदर 2' हा सिनेमा रिलीज झाला आणि पुन्हा एकदा ती प्रकाशझोतात आली. 'गदर 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. इतकंच नाही तर अनेक दिग्गज सेलिब्रिटींनीही सनी देओल आणि अमिषा यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. यामध्येच अमिषाने प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची एक आठवण सांगितली आहे. भन्साळींनी ज्यावेळी 'गदर' सिनेमा पाहिला होता. त्यावेळी त्यांनी अमिषाला थेट रिटायर होण्याचा सल्ला दिला. अमिषाने 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय लीला भन्साळी यांनी दिलेल्या सल्ल्याविषयी भाष्य केलं. 

नेमकं काय म्हणाले भन्साळी

"संजय लीला भन्साळी यांनी गदर पाहिल्यानंतर मला एक लेटर पाठवलं होतं. या लेटरमध्ये त्यांनी माझं कौतुक केलं होतं. त्यानंतर आमची एका कार्यक्रमात भेट झाली. या भेटीमध्ये 'अमिषा, तुला रिटायर व्हायला पाहिजे आता', असं ते मला म्हणाले. मी एकदम गोंधळून गेले आणि 'का?' असा प्रश्न विचारला. त्यावर, तू दोन सिनेमातून जे काही मिळवलंय ते मिळवण्यासाठी लोक आयुष्यभर प्रयत्न करतात. पण मिळवू शकत नाहीत. लाइफटाइममध्ये क्वचितच 'मुगल-ए-आझम', 'मदर इंडिया', 'पाकिजा' यांसारखे सिनेमा तयार होतात. पण, तुला तर दुसऱ्याच सिनेमातून सगळं मिळालं. मग आता अजून काय हवंय? त्यावेळी माझं फार वय नव्हतं त्यामुळे ते काय बोलतायेत ते मला कळत नव्हतं. मी इंडस्ट्रीमध्ये नवीनच होते."

दरम्यान,  अमिषाने 'कहो ना प्यार है' या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर ती सनी देओलसोबत गदर या सिनेमात झळकली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या सिनेमामुळे ती रातोरात स्टार झाली.

टॅग्स :बॉलिवूडसंजय लीला भन्साळीअमिषा पटेलसनी देओलसेलिब्रिटीसिनेमा