कलाविश्वात दररोज कोणत्या ना कोणत्या नव्या गोष्टीची चर्चा रंगत असते. कधी कलाकारांच्या पर्सनल लाइफविषयी तर कधी एखादा जुना किस्सा चर्चेत येत असतो. सध्या नेटकऱ्यांमध्ये प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान (saroj khan) आणि रेखा (rekha) यांच्यातील मतभेदाची चर्चा रंगली आहे. सरोज खान यांनी चित्रपटाच्या सेटवर रोखठोकपणे रेखाला सुनावल्यामुळे तिला रडू कोसळलं होतं. इतकंच नाही तर ज्या चित्रपटासाठी रेखाने नकार दिला होता तोच चित्रपट तिने केलादेखील.
एका जुन्या मुलाखतीत सरोज खान यांनी हा किस्सा सांगितला होता. 'शेषनाग' या चित्रपटाच्या वेळी रेखा आणि सरोज यांच्यात शाब्दिक वाद झाले होते. "शेषनाग चित्रपटातील एक गाण्याच्या चित्रीकरणाची डेट निर्मात्यांनी अचानकपणे बदलली. वेळेच्या दोन दिवस आधीच हे गाणं तयार हवं असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे हे गाणं बसवायला फार कमी वेळ राहिला होता. या गाण्यात रेखा लीडमध्ये होते. परंतु, रेखा सातत्याने रिहर्सला येण्यासाठी टाळाटाळ करत होती", असं सरोज म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "एक दिवस तर रेखा सेटवर पोहोचली पण तिच्या गाडीतून उतरायला तयार नाही. त्यामुळे मी तिला भेटायला गेले. त्यावेळी रेखाने बरं नसल्यामुळे शूटिंग कॅन्सर करुयात असं म्हटलं. त्यावर मी तिला थेट सुनावलं."
"कदाचित तुला माझी अॅलर्जी आहे. मी सतत तुला सरावासाठी बोलावते पण तू येत नाहीत. तब्येतीचं कारण पुढे करतेस. तू डान्स मास्टर चेंज कर. मला वाटतंय काही तरी गडबड आहे", असं सरोज म्हणाल्या. त्यांच्यावर रेखाला रडू कोसळलं आणि ती सेटवरच रडू लागली. त्यानंतर तिने चित्रीकरणासाठी होकार दिला.
दरम्यान, सरोज खान यांनी सुनावल्यानंतर रेखा मेकअप रुममध्ये गेली आणि ढसाढसा रडली. रेखा रडल्याचं संपूर्ण सेटवर समजलं त्यानंतर सरोज यांनी तिची भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं तिला नीट समजावलं. सरोज खान या कलाविश्वातील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका होत्या. त्यांनी बिंदिया गोस्वामी, रेखा, करिश्मा कपूर, श्रीदेवी, माधुरी दक्षित, कंगना रणौत सारख्या अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे.