बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आपलं वजन कमी करणाऱ्या लिस्टमध्ये अनेक अभिनेत्रींची नाव सामील आहेत. बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हानाचे नाव देखील या लिस्टमध्ये सामील आहे. तिने २०१० साली सलमान खानच्या दबंग चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सिनेइंडस्ट्रीत येण्यापूर्वी तिचे वजन चक्क ९० किलो इतके होते. हे ऐकून जरा तुम्हाला धक्का बसला असेल ना... हो, हे खरे आहे. तिने चक्क ९० किलो वजन होते आणि तिने दबंग चित्रपटासाठी तब्बल ३० किलोंनी वजन घटवले.
अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, सोनाक्षीला वजनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. रिपोर्टनुसार सोनाक्षी खेळात तरबेज होती मात्र तरीही लोक तिची खिल्ली उडवायचे. वजन जास्त असल्यामुळे तिला शाळेतील नाटकांपासून दूर ठेवणं आलं.
सोनाक्षीने दबंग सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१९मध्ये सोनाक्षीने चार सिनेमे केलेत. यातील ‘दबंग3’ वर्षाच्या शेवटला रिलीज झाला. 2019 मध्ये सोनाक्षीने कलंक, खानदानी शफाखाना आणि मिशन मंगल, दबंग ३ असे चार सिनेमा रिलीज झाले.