Join us

"पप्पा, आपला धर्म कोणता?" सुहानाने विचारलेला शाहरुखला प्रश्न, लेकीला उत्तर देत अभिनेता म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 11:53 IST

आंतरधर्मीय विवाह केलेले शाहरुख-गौरी घरी कोणत्या धर्माचं पालन करतात, याबाबत नेहमीच चर्चा होत असते. असाच प्रश्न शाहरुखची लेक सुहानानेही अभिनेत्याला विचारला होता.

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान कायमच चर्चेत असतो. धर्माने मुस्लिम असलेल्या शाहरुखनने हिंदू धर्मीय गौरीशी विवाह केला. गेली २४ वर्ष ते सुखाने संसार करत आहेत. शाहरुख-गौरीला आर्यन, सुहाना आणि अबराम ही तीन मुले आहेत. शाहरुख त्याच्या लाइफस्टाइलमुळेही चर्चेत असतो. आंतरधर्मीय विवाह केलेले शाहरुख-गौरी घरी कोणत्या धर्माचं पालन करतात, याबाबत नेहमीच चर्चा होत असते. असाच प्रश्न शाहरुखची लेक सुहानानेही अभिनेत्याला विचारला होता. 

लहानपणी सुहानाने शाहरुखला आपला धर्म कोणता असं विचारलं होतं. शाहरुखने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. शाहरुखने या मुलाखतीत धर्मावर भाष्य केलं होतं. "आम्ही हिंदू-मुसलमान याबाबत बोललो नाही. माझी पत्नी हिंदू आहे आणि मी मुसलमान. आणि माझी मुलं हिंदुस्तानी आहेत", असं तो म्हणाला होता. याचवेळी त्याने सुहानाचा किस्साही सांगितला होता. शाळेच्या एका फॉर्ममध्ये धर्माविषयी माहिती भरायची होती. तेव्हा सुहानाने शाहरुखला धर्माबद्दल विचारलं होतं. तेव्हा शाहरुखने उत्तमप्रकारे तिला समजावलं होतं. 

"जेव्हा मुलं शाळेत जातात तेव्हा फॉर्ममध्ये त्यांना धर्म कोणता हे लिहावं लागतं. जेव्हा माझी मुलगी छोटी होती तेव्हा तिने मला येऊन विचारलं होतं की पप्पा आपला धर्म कोणता होता? मी त्यात लिहिलं की आम्ही भारतीय आहोत. आमचा कोणताच धर्म नाही आणि नसलाही पाहिजे", असंही शाहरुखने सांगितलं होतं. 

टॅग्स :शाहरुख खानसुहाना खान