सनी देओलच्या ‘गदर 2’ने सगळीकडेच धमाका केला आहे. केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगभरात ‘गदर 2’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. सनी देओलच्या ‘गदर 2’ने चाहत्यांना अक्षरश: वेडं करुन सोडलं आहे. ‘गदर 2’चे शो हाऊसफूल होत आहेत. प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच 'गदर 2'च्या ओटीटी प्रदर्शनाबाबत चर्चा रंगली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार ‘गदर 2’ हा चित्रपट झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 6 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. गदर 2’ या चित्रपटाचे डिजिटल आणि सॅटेलाइट राइट्स ‘झी’कडे आहेत. म्हणूनच हा चित्रपट ‘झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘गदर 2’ हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. ‘गदर : एक प्रेम कथा’ हा 4K क्वालिटीमध्ये प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये सनी देओल, अमीषा पटेलच्या मुख्य भूमिका आहेत.
11 ऑगस्ट रोजी सनी देओलचा 'गदर 2' रिलीज झाला. सनीने उत्तम अभिनयकौशल्याच्या जोरावर पुन्हा एकदा तारासिंग ही भूमिका जीवंत केली. त्यामुळे सर्व स्तरांमधून त्याच कौतुक होत आहे. सिनेमाला रिलीज होऊन 39 दिवस उलटून गेले आहेत. तरी 'गदर 2'ची घौडदौड अजूनही सुरुच आहे. रविवारी सिनेमाने पुन्हा कोटींची कमाई केली. शाहरुखचा 'जवान' स्पर्धेत आला असतानाही तारासिंगला काहीच फरक पडलेला नाही. बड्या बजेटचे सिनेमेही आजकाल महिनाभर टिकत नाही तर तिथे 'गदर 2' आणि 'जवान' मात्र अपवाद ठरत आहेत.