बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) ८०च्या दशकापासून सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. पण काही वर्षांपूर्वीच त्यांना चित्रपटांमध्ये चांगली संधी मिळू लागली. नुकत्याच एका मुलाखतीत, नीना गुप्ता यांनी आठवण करून दिली की १९८०च्या दशकात कामाची पद्धत खूपच वेगळी आणि कठीण होती. त्यांनी त्यावेळीच्या वर्क कल्चरबद्दल सांगितले आहे.
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्ता यांनी १९८० च्या वर्क कल्चरवर मोकळेपणाने सांगितले. नीना गुप्ता यांनी असेही सांगितले की, एका वेळी त्यांना दिग्दर्शकाने शिवीगाळ केली होती. यानंतर त्या खूप रडल्या होत्या. खरं तर, मुलाखतीत नीना गुप्ता यांना त्यांच्या करिअरमधील सर्वात विचित्र अनुभवाबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर अभिनेत्रीने एक धक्कादायक गोष्ट शेअर केली आहे.
नीना गुप्ता यांनी सांगितले की, 'मी एक चित्रपट करत होते. चित्रपटातील माझी भूमिका खूपच लहान होती. एका सीनमध्ये माझे २-३ डायलॉग होते. शूटिंगदरम्यान ते डायलॉग काढून टाकण्यात आले. यानंतर माझी कोणतीही भूमिका राहिली नाही. भूमिका कापल्यामुळे त्रस्त झालेल्या नीना गुप्ता दिग्दर्शकाकडे गेल्या. यावर पुढे त्या म्हणाल्या की, 'मी दिग्दर्शकाकडे गेले आणि म्हणाले की माझ्याकडे दोन ओळी आहेत, त्याही कापल्या गेल्या. हे ऐकून दिग्दर्शकाने मला आई आणि बहिणीवरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्या चित्रपटाच्या सेटवर जुही चावला आणि विनोद खन्नाही उपस्थित होते. दिग्दर्शकाने ज्याप्रकारे सर्वांसमोर मला शिवीगाळ केली, ते पाहून मी रडायला लागले.
हा किस्सा शेअर केल्यानंतर नीना गुप्ता म्हणाल्या की, पूर्वीच्या तुलनेत आता काम करण्याची पद्धत खूप बदलली आहे. इंडस्ट्रीत आता असे वर्क कल्चर नाही. त्या म्हणाल्या की, 'आता असे होईल असे वाटत नाही. असे झाले तरी मी त्या टप्प्यावर आहे जिथे माझ्या आई बहिणीवरुन मला कोणी शिवी देत नाही. दुसरीकडे, नीना गुप्ता यांच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर, नीना गुप्ता नुकत्याच संजय मिश्रासोबत 'वध' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात नीना गुप्ता संजय मिश्राच्या पत्नीच्या भूमिकेत दिसल्या होत्या. 'वध'मध्ये नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांची जोडी खूप आवडली होती.