Join us

Malaika Arora Video: निर्मात्याने बायको समजून धरला मलायकाचा हात; पुढे काय घडलं...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 17:55 IST

Malaika Arora Video: ४९ वर्षांच्या मलायकाचा फिटनेस आणि तिचा फॅशन सेन्स पाहून सगळेच थक्क होतात. सध्या काय तर मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

बॉलिवूडची मुन्नी अर्थात मलायका अरोरा जिथे जाईल तिथे सर्वांचं लक्ष वेधून घेते. ४९ वर्षांच्या मलायकाचा फिटनेस आणि तिचा फॅशन सेन्स पाहून सगळेच थक्क होतात. सध्या काय तर मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. होय, व्हिडीओत एक व्यक्ती अचानक मलायकाचा हात पकडतो, यानंतर जे काही घडतं ते बघण्यासारखं आहे.

व्हिडीओत मलायका थाई हाय स्लीट ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. हा व्हिडीओ एका डिनर पार्टीचा असल्याचा दावा केला जातोय. काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा, रितेश सिधवानी आणि त्याची पत्नी डॉली सिधवानीसोबत डिनर एन्जॉय करताना दिसली होती. याचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे. पार्टी आटोपल्यानंतर मलायका आपल्या मित्रांसोबत बाहेर पडते. याचदरम्यान रितेश सिधवानी कॉलवर बोलता बोलता अचानक बायकोचा हात पकडण्याऐवजी मलायकाचा हात पकडतो. मात्र त्याला लगेच चूकीची जाणीव होते. ही आपली पत्नी नसून मलायका असल्याचं कळताच, तो लगेच आपला तिचा हात सोडून पत्नीचा हात धरतो. मलायका यादरम्यान कुठल्याहीप्रकारे रिॲक्ट करत नाही. ती शांतपणे चालताना दिसते.मलायकाचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. नेटकरी या व्हिडीओवर एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स करत आहेत.

मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतोय. अलीकडे मलायकाने अर्जुनसोबतच्या लग्नावर खुलासा केला होता. ती म्हणाली होती, आम्ही लग्नाबद्दल विचार करतो. काही लोक आम्हाला स्वार्थी समजतात, पण आम्ही प्रेमात आहोत आणि विवाह संस्थेवर माझा विश्वास आहे. मी लग्न कधी करणार, हे मला माहित नाही. कारण आयुष्यात प्रत्येक गोष्टीचं नियोजन करता येत नाही. मी फार प्लानिंग करत नाही. अती प्लानिंग आजचा दिवस खराब करतो, असं माझं मत आहे.

टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूड