या कारणामुळे विकी कौशल लपला होता शाहरुख खानच्या घरातील पडद्यामागे... वाचून तुम्ही देखील हसाल खळखळून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 01:08 PM2019-03-26T13:08:59+5:302019-03-26T13:12:34+5:30
विकीचा फॅशन सेन्स खूपच चांगला असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे असते. पण तुम्हाला माहीत आहे का, विकीला एकदा त्याच्या कपड्यांमुळे चक्क शाहरुख खानच्या बंगल्यात पडद्यामागे लपण्याची वेळ आली होती.
विकी कौशलने संजू या चित्रपटात साकारलेल्या कमली या व्यक्तिरेखेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. उरीः द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. विकी कौशलच्या अभिनयासोबतच त्याच्या लूक्सची नेहमीच चर्चा असते. विकीचा फॅशन सेन्स खूपच चांगला असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे असते. पण तुम्हाला माहीत आहे का, विकीला एकदा त्याच्या कपड्यांमुळे चक्क शाहरुख खानच्या बंगल्यात पडद्यामागे लपण्याची वेळ आली होती.
विकीनेच ही गोष्ट एका चॅट शोच्या दरम्यान सांगितली आहे. शाहरुख खानच्या दिवाळी पार्टीत विकी, तापसी पन्नू आणि राजकुमार राव यांनी चुकीचा ड्रेस कोड केल्यामुळे त्यांच्यावर लोकांपासून लपण्याची पाळी आली होती. याविषयी विकी सांगतो, शाहरुख सरांनी मला फोन केला आणि सांगितले की, काही दिवसांपूर्वी माझा वाढदिवस होता. त्यामुळे मी माझ्या फ्रेंड्ससाठी एक छोटीशी डिनर पार्टी आयोजित केली आहे. तू या डिनर पार्टीला नक्की ये. या पार्टीमुळे मला पहिल्यांदाच मन्नत मध्ये जाण्याची संधी मिळणार होती. त्यामुळे मी खूपच उत्सुक होतो. मी माझी डेनिमची जीन्स, टीशर्ट असे कॅज्युअल कपडे घातले आणि पार्टीला पोहोचलो. पण तिथे गेल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला. करिना कपूर खान, मल्लाईका अरोरा सगळेच या पार्टीत ट्रेडिशनल कपड्यांमध्ये आले होते. त्यामुळे आता काय करायचे मला काहीच सुचत नव्हते. कोणाचे लक्ष जाऊ नये यासाठी मी अक्षरशः पडद्यामागे उभा होतो. मी, तापसी आणि राजकुमार आम्ही तिघांनी देखील ट्रेडिशनल कपडे घातले नव्हते. त्यामुळे कोणी पाहू नये यासाठी पडद्याच्या मागे असलेल्या एका कॉर्नरमध्येच आम्ही तिघे उभे राहून गप्पा मारत होतो. आमच्या तिघांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पार्टीला मी पोहचलो होतो. त्यामुळे ते दोघे येईपर्यंत तर माझी अवस्था अतिशय वाईट झाली होती आणि त्यात करण जोहरने मला पाहिले आणि तो माझ्याकडे पाहून म्हणाला आपल्याला बोलण्याची गरज आहे. त्यावर काय बोलायचे हेच मला कळत नव्हते.