Join us

जब मिलेंगे तीन यार : सलमान खान-करण जोहरच्या चित्रपटात अक्षय कुमार हीरो!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2017 11:47 AM

नव्या वर्षाची सर्वात मोठी घोषणा झाली आहे. इंडस्ट्रीमधील तीन टोकाचे तीन मोठे सेलिब्रेटी एकत्र मिळून एका सिनेमाची निर्मिती करणार ...

नव्या वर्षाची सर्वात मोठी घोषणा झाली आहे. इंडस्ट्रीमधील तीन टोकाचे तीन मोठे सेलिब्रेटी एकत्र मिळून एका सिनेमाची निर्मिती करणार असून नुकतीच त्याची घोषणा करण्यात आली आहे. ते तीन सेलिब्रेटी म्हणजे ‘दबंग’ सलमान खान, ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता करण जोहर.बॉलीवूडमध्ये प्रथमच हे तीन दिग्गज एकत्र काम करणार आहेत. सलमानने मतभेद बाजूला ठेवूनकरण जोहरसोबत हातमिळवणी केली आहे. दोघे एकत्र मिळून एका सिनेमाची निर्मिती करणार असून त्यामध्ये प्रमुख अभिनेता म्हणून अक्षय कुमार झळकणार आहे. पंजाबी चित्रपटांचे दिग्दर्शक अनुराग सिंग या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून त्याने तो ‘जट अँड ज्युलियट’ या चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे.एकाच वेळी तिघांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. सलमानने लिहिले की, करण आणि मी मिळून एक प्रोजेक्ट हाती घेतला असून अक्षय कुमार त्यामध्ये हीरो आहे. अक्षयने ट्विट केले की, करण जोहर आणि सलमान खान या मित्रांसोबत मी काम करतोय. करणने आनंद व्यक्त करताना लिहिले की, सलमानसोबत चित्रपटाची निर्मिती करण्याबाबत मी खूप एक्सायटेड आहे.  चित्रपटाचे नाव अद्याप ठरले नसून यावर्षी त्याची शूटींग सुरू होणार आहे आणि पुढच्या वर्षी तो रिलीज होईल. यात सलमान कॅमिओ करणार का हे निश्चित नाही.विशेष म्हणजे करण आतापर्यंत केवळ शाहरुखासोबत काम करतो असे मानले जायचे. अनेक चित्रपटांत शाहरुख त्याचा सहनिर्मातासुद्धा राहिलेला आहे. शाहरुख-सलमानच्या वादामुळे करण भाईजानपासून दोन हात लांबच राहायचा. आता मात्र ते दोघे पुन्हा एकदा जिवलग मित्र बनले असल्याने करणला सलमानसोबत काम करणे सोयीचे झाले. तसेच करण त्याच्या व्यवसायाचा आवाका वाढवण्यासाठी सलमानसारख्या बॉक्स आॅफिस किंगशी हात मिळवू पाहत आहे. सल्लूमियांचा तिकिट खिडकीवर सध्या सुवर्णकाळ सुरू आहे. गेल्या वर्षी ‘सुल्तान’ने ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई करून पहिले स्थान पटकावले. सलमानने करणचा पहिला सिनेमा ‘कुछ कुछ होता है’मध्ये सहअभिनेत्याची भूमिका केली होती. अक्षयनेसुद्धा यापूर्वी करण निर्मित ‘ब्रदर्स’मध्ये काम केलेले आहे. ‘कॉफी विथ करण’च्या दोन्ही सीझनमध्ये अक्षय-सलमानला बोलवून करणने त्यांची मैत्री अधिक घट्ट केली. त्यांचा हा ‘प्रोजेक्ट’ बॉलीवूडमधील नव्या बदलांची नांदी आहे, असे म्हटले जातेय. प्रोड्युसर म्हणूनही ‘दबंग’गेल्या काही वर्षांपासून सलमान निर्मितीच्या क्षेत्रात उतरला आहे. त्याच्या ‘सलमान खान प्रोडक्शन’चा पहिला सिनेमा होता 'चिल्लर पार्टी'.  त्यानंतर कबीर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ त्याने प्रोड्युस केला. देशात ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आणि सल्लूमियां निर्मितीच्या क्षेत्रातही ‘दबंग’ ठरला. त्यानंतर आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया या दोघांना त्याने 'हीरो' सिनेमातून लाँच केले.अक्षय-सलमान पुन्हा एकत्र डेविड धवन दिग्दर्शित ‘मुझसे शादी करोगी'मध्ये (२००४) अक्षय आणि सलमान शेवटचे एकत्र दिसले होते. सलमान आणि अक्की बॉलिवूडमध्ये आता स्वतंत्र ब्रँड बनले आहेत. अक्षय कुमार किंवा सलमानचा  सिनेमा म्हटलं तर प्रेक्षक आपोआपच सिनेमागृहांकडे खेचले जातात. cnxoldfiles/a>’ ईदला रिलीज होतेय.