Join us

सलमान खानचं लग्न कधी होणार? कतरिना कैफने केला खुलासा, पहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 14:22 IST

कतरिना कैफने सलमान खानच्या लग्नाबाबत केला खुलासा

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सगळे लॉकडाउन आहेत. त्यामुळे सगळे घरात बंद आहेत. लोक घरात कंटाळू नयेत म्हणून त्यांच्या मनोरंजनासाठी रामायण व महाभारत सारख्या जुन्या मालिका पुन्हा प्रसारीत केल्या जात आहेत. त्यात कपिल शर्मा शोमध्येदेखील प्रेक्षकांची ऑनस्क्रीन लोकप्रिय जोडी सलमान खानकतरिना कैफ पहायला मिळाले. हा व्हिडिओ जेव्हा सलमान व कतरिना त्यांच्या भारत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शोमध्ये आले होते तेव्हाचा आहे.

सोनी टिव्हीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत आहे. या व्हिडिओतून सलमान व कतरिनाचा एपिसोड शनिवारी प्रसारीत केल्याचे सांगितले. हा एपिसोड जुना असला तरी मजेशीर आहे. यावेळी सलमान व कतरिनाची छान केमिस्ट्री पहायला मिळाली. तसेच यावेळी अर्चना पूरण सिंग कतरिनाच्या डाएटबद्दलही विचारले होते.

यादरम्यान जेव्हा कपिलने कतरिनाला विचारले की तुला कोणत्या गोष्टींची भीती वाटते? त्यावर कतरिना म्हणाली प्रेमाला. त्यानंतर कपिलने विचारले की सलमानचे लग्न कधी होणार ?

त्यावर कतरिना म्हणाली की या प्रश्नाचे उत्तर फक्त दोन जणच देऊ शकतात ते म्हणजे एक देव आणि दुसरा सलमान. हे उत्तर ऐकल्यानंतर सलमानने दिलेली रिएक्शन पाहण्यासारखी होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉकडाउननंतर सलमान त्याचा आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. हा सिनेमा टायगर जिंदा हैचा सीक्वल असणार आहे.

रिपब्लिक वर्ल्डच्या रिपोर्टनुसार, सलमान लॉकडाउनमध्ये त्याच्या नव्या सिनेमाच्या स्क्रीप्ट वाचत आहेत. यादरम्यान हे निश्चित झालं आहे की सलमान टायगरच्या सीक्वलवर काम करणार आहे. अद्याप याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

टॅग्स :सलमान खानकतरिना कैफद कपिल शर्मा शोकपिल शर्मा