बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारे ‘सदाबहार अभिनेते’ देव आनंद यांची आज जयंती. आपल्या कारकिर्दींत देवआनंद यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या. पण त्याशिवायही देव आनंद यांचे बॉलिवूड इंडस्ट्रीत बरेच मोठे योगदान आहे. देव आनंद यांनीच बॉलिवूड इंडस्ट्रीला टीना मुनीम आणि जीनत अमान सारख्या ‘सेक्स सायरन’ मानल्या गेलेल्या नट्या दिल्यात. आपल्या पर्सनल लाईफमुळेही देव आनंद कायम चर्चेत राहिले. अनेक अभिनेत्रींवर त्यांचा जीव जडला. पण त्यांची प्रेमकहाणी कथेच पूर्ण झाली नाही. आज आम्ही तुम्हाला देव आनंद यांची अशीच एक प्रेम कहाणी सांगणार आहोत. ही प्रेम कहाणी आहे देव आनंद आणि झीनत अमान यांची.
देव आनंद यांनी ‘हरे राम हरे कृष्णा’ या चित्रपटात झीनत अमानला कास्ट केले होते. देवानंद यांच्या बहीणीची भूमिका झीनतने साकारली होती. पण शूटींगदरम्यानचं देव आनंद झीनतच्या प्रेमात पडले. तिची प्रत्येक गोष्ट देव आनंद यांना आवडू लागली. देवआनंद यांच्या या प्रेमाची खबर झीनतआधी मीडियाला लागली. दोघांच्याही लिंकअपच्या बातम्या मीडियात चवीने चघळल्या जावू लागल्यात. या बातम्या वाचून देव आनंद मनातल्या मनात खूश होत. स्वत: देव आनंद यांनीच आपल्या ‘रोमांसिंग विद लाईफ’ या आत्मचरित्रात याचा खुलासा केला होता. एकदिवस देव आनंद यांनी झीनतला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. हॉटेल ताजमध्ये प्रपोज करण्याचा बेत त्यांनी बनवला. कारणझीनत व देव आनंद याच हॉटेलात अनेकदा डिनरला जात. झीनतला प्रपोज करण्यासाठी देव आनंद यांनी एक छोटीशी पार्टी ठेवली. देव आनंद यांचे अतिशय जवळचे मित्र आणि झीनतला या पार्टीचे निमंत्रण दिले गेले. पण या पार्टीत असे काही झाले की, देव आनंद यांची सगळी स्वप्ने क्षणात भंगली.
पार्टीत राज कपूर नशेच्या स्थितीत झीनतजवळ गेले आणि त्यांनी तिला आपल्या मिठीत घेतले. झीनतनेही राज कपूर यांना घट्ट मिठी मारली. हे पाहून देव आनंद समजायचे ते समजले. त्याआधी राज कपूर आणि झीनतयांच्या रोमान्सच्या बातम्या त्यांच्या कानावर आल्या होत्याच. याचमुळे राज कपूर यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’मध्ये झीनतला लीड रोल दिला होता. पण तेव्हा देव आनंद यांनी या बातम्यांकडे दुर्लक्ष केले होते. पण पार्टीतल्या त्या एका घटनेनंतर झीनत त्यांच्या हृदयातून कायमची निघाली. आपल्या पुस्तकात त्यांनी या प्रसंगाचा उल्लेख केला आहे. ते दृश्य पाहून मी पार्टीतून बाहेर पडलो. यानंतर मी कधीच झीनतबद्दल विचार केला नाही, असे त्यांनी लिहिले आहे.