Join us

सुंदरता अशी की बॉलिवूड पडलेलं प्रेमात, अचानक अ‍ॅक्टिंग सोडून पतीचा बिझनेस सांभाळण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 6:54 PM

बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर आज ती एका कंपनीची डायरेक्टर आहे.

हिंदी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलेली ट्युलिप जोशी हा चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. गुजराती कुटुंबातील या अभिनेत्रीने अगदी लहान वयातच इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केले होते. ट्युलिपला सौंदर्य स्पर्धांची खूप आवड होती. फार कमी लोकांना माहिती आहे की, अभिनेत्रीने 2000 साली मिस इंडियामध्ये भाग घेतला होता, मात्र तेव्हा ती जिंकू शकली नव्हती. 

ट्युलिपचा पहिलाच सिनेमा हिट झाला होता. पहिलाच सिनेमा यशराजचा आणि तो सुद्धा हिट, यामुळे ट्युलिप चर्चेत आली होती, मात्र यानंतर प्रेक्षकांनी तिला नाकारले़. 

‘मेरे यार की शादी है’ या चित्रपटात काम करण्याची संधी ट्युलिपला योगायोगाने मिळाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य चोप्रा त्याच्या मित्राच्या लग्नात गेले होते. तिथे त्याने ट्युलिपला पाहिले होते. याठिकाणी ट्युलिप आदित्यच्या नजरेत भरली होती आणि त्याने तिथेच तिला ‘मेरे यार की शादी है’ ऑफर केला होता. ट्युलिपसाठी हा सुखद धक्का होता. यशराज बॅनरचा सिनेमा मिळाल्याने तिचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. मात्र ट्युलिपला हिंदी तितकं नीट येत नव्हते. त्यानंतर तिने हिंदी धडे गिरविले आणि चित्रपटात काम केले.

2004मध्ये ट्युलिपला शाहिद कपूरसोबत ‘दिल मांगे मोर’मध्ये संधी मिळाली. पण हा सिनेमा इतका दणकून आपटला. ट्युलिप जवळपास 20 सिनेमात दिसली. पण आपली ओळख निर्माण करू शकली नाही. यानंतर ट्युलिप बॉलिवूडमधून गायब झाली. बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर ट्युलिपने कॅप्टन विनोद नायर यांच्याशी लग्नगाठ बांधली. विनोद नायर हे ‘प्राइड ऑफ लॉयन्स’चे या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक असून यशस्वी बिझनेसमॅनदेखील आहेत. लग्नानंतर ट्युलिन नवरा विनोद नायरसोबत त्यांचा कोटीचा बिझनेस सांभाळते आहे. ती कंपनीची डायरेक्टर आहे.

 

टॅग्स :सेलिब्रिटी