Join us  

80च्या दशकातील अभिनेता राज किरण अनेक वर्षांपासून आहे बेपत्ता, संपत्ती हिसाकवून घेतल्याचा कुटुंबीयांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2022 12:26 PM

2011 मध्ये ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांना त्यांच्याबद्दल माहिती मिळाली आणि कळले की राज किरण अमेरिकेत मनोरुग्णालयात आहे.

'बुलंदी' 'कर्ज', 'घर हो तो ऐसा', 'तेरी मेहरानबनिया'सह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता राज किरण (Raj Kiran)  गेली अनेक वर्षे गायब आहे. राज 80 च्या दशकातील जवळपास प्रत्येक चित्रपटाचा भाग असायचा. राज किरणच्या आयुष्यात कधी अंधार पडला हे कोणालाच कळले नाही. हे असे जग आहे जिथे सर्वजण उगवत्या सूर्याला नमस्कार करतात आणि मावळत्या सूर्याला कोणी पाहत नाही.

राज जोपर्यंत चित्रपटात होता, तोपर्यंत सर्वांनी त्याला विचारले, त्याचे स्वागत केले, पण जेव्हा चित्रपटांशी संबंध तुटला तेव्हा इंडस्ट्रीतील लोकांनीही राज किरणशी नातं तोडलं. जेव्हा राज किरणला त्याच्या कुटुंबाची सर्वात जास्त गरज होती तेव्हा कोणीही त्याच्यासोबत नव्हते. त्याच्या कुटुंबीयांनाही त्याची साथ सोडून दिली.

राज किरणने आपल्या करिअरमध्ये 100 हून अधिक चित्रपट केले आहेत. त्यानी केवळ सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले नाही तर अनेक चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केले. राज किरण याचे पूर्ण नाव राज किरण मेहतानी आहे. भारतातील त्याचे चाहते त्याला अनेक वर्षांपासून बेपत्ता मानतात कारण त्याच्याबद्दल कोणतीच माहिती कोणालाच नाही.

वास्तविक राजकिरण त्याच्या फिल्मी करिअरच्या चढ-उताराच्या काळात डिप्रेशनमध्ये गेला होता. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांनीही त्याचा विश्वासघात केला होता, तेव्हापासून त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. काही वर्षापूर्वी दीप्ती नवल यांनी त्याला अमेरिकेत टॅक्सी चालवताना पाहिले होते. 2011 मध्ये, ऋषी कपूर यांना त्यांच्याबद्दल माहिती मिळाली आणि कळले की राज किरण अमेरिकेत मनोरुग्णालयात आहे.

राजकिरणच्या पत्नीचे म्हणणे होते की, तिचा पती अनेक वर्षांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू आहे.  1994 मध्ये शेखर सुमनच्या रिपोर्टर सिरिअलमध्ये राज किरण टीव्हीवर दिसला होता. काहींचे म्हणणे आहे की चित्रपटात काम न मिळल्याने तो डिप्रेशनमध्ये गेला तर काहींच्या मते त्याच्या कुटुंबाने त्याची सर्व संपत्ती  हिसाकवून घेतली. सत्य काय आहे हे कोणालाच माहीत नाही. 

टॅग्स :ऋषी कपूरबॉलिवूड