ठळक मुद्देनागरिकता संशोधन कायद्यावरुन बऱ्याच ठिकाणी आंदोलने होत आहेत. हा कायदा लागू झाल्यास प्रत्येकाला भारतीय नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे.बॉलिवूडचा विचार केला तर या इंडस्ट्रीत बरेच अॅक्टर्स आहेत जे भारतीय नाहीत.
-रवींद्र मोरेनागरिकता संशोधन कायद्यावरुन बऱ्याच ठिकाणी आंदोलने होत आहेत. हा कायदा लागू झाल्यास प्रत्येकाला भारतीय नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. बॉलिवूडचा विचार केला तर या इंडस्ट्रीत बरेच अॅक्टर्स आहेत जे भारतीय नाहीत मात्र तरीही त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे भारतीयांच्या मनात जागा निर्माण केली आहे. बरेच फॅन्स-फॉलोवर्स तर त्यांच्या जीवनशैलीचे अनुकरण करताना दिसतात. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबाबत जाणून घेऊया ज्यांच्याकडे भारताचे नागरिकत्व नाहीय...* कॅटरिना कैफ
या यादीत सर्वात अगोदर नाव येते ते अभिनेत्री कॅटरिना कैफचे. कॅटरिनाचे खरे नाव आहे कॅटरिना टॉरकूटो. तिचा जन्म १६ जुलै, १९८३ रोजी हॉँगकॉँगमध्ये झाला होता. बॉलिवूडमध्ये कॅटरिना कै फने २००३ मध्ये ‘बूम’ चित्रपटातून पदार्पण करत आज भरभक्कम स्थान प्रस्थापित केले असून एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. जरी आज ती भारतात राहून नाव कमवित आहे, मात्र आजही तिचे नागरिकत्व ब्रिटनमधलेच आहे.* सनी लियोनी
कॅनडाच्या सर्नियामध्ये जन्मलेली बॉलिवूडची बेबी डॉल सनी लियोनीने आज बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा जन्म १३ मे, १९८१ मध्ये झाला होता. ती एक इंडियन-अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडल आहे. तिचे खरे नाव करनजीत कौर वोहरा आहे. ती विवाहित असून ती अगोदर पोर्नस्टार होती. मात्र तिचे नागरिकत्व कॅनाडाई-अमेरिकन आहे.* जॅकलिन फर्नांडिस
जॅकलिन एक श्रीलंकन अभिनेत्री आहे आणि तिचा जन्म ११ आॅगस्ट, १९८५ रोजी मनामा येथे झाला होता. जॅकलिनने आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात २००९ मध्ये ‘अलादीन’ पासून केली होती. यात तिच्या सोबत रितेश देशमुख आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर ‘मर्डर 2’ मध्ये इमरान हाशमीसोबत दिसली होती. जॅकलिन आज बॉलिवूडवर राज करत आहे, मात्र आजही तिचे नागरिकत्व श्रीलंकाचे आहे.* एली अवराम
एली अवराम एक स्वीडिश अभिनेत्री आहे आणि बॉलिवूड ती सध्या नशिब आजमावत आहे. ती टीव्हीवर प्रेझेंटर आणि होस्टचेही काम करते. विशेष म्हणजे तीने अनेक चित्रपटात आयटम नंबर करताना दिसली आहे. मात्र तिचे नागरिकत्व स्वीडनचे आहे.* नर्गिस फाखरी
बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीचा जन्म २० आॅक्टोबर, १९७९ रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात झाला होता. नर्गिस एक अमेरिकन मॉडल आणि अभिनेत्री आहे जी बॉलिवूडमध्येही आपले नशिब आजमावत आहे. मात्र नर्गिसला बॉलिवूडमध्ये अपेक्षित यश मिळत नाही. २०११ मध्ये ‘रॉकस्टार’मधून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. विशेष म्हणजे नर्गिसचे नागरिकत्व पाकिस्तानी आणि अमेरिकन असे मिक्सअप आहे, ती स्वत:ला ग्लोबल सिटीजनशिपची मानते.