Join us

‘अभिनय क्षेत्राला अनपेक्षित’ म्हणणारी ही अभिनेत्री कोण? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2018 7:13 AM

अभिनेत्री मालविका मोहनन म्हणजे सुप्रसिद्ध सिनेमेटोग्राफर के. यू. मोहनन यांची लाडकी लेक आणि मल्याळम चित्रपटांची एक लोकप्रिय अभिनेत्री. मालविकाला ...

अभिनेत्री मालविका मोहनन म्हणजे सुप्रसिद्ध सिनेमेटोग्राफर के. यू. मोहनन यांची लाडकी लेक आणि मल्याळम चित्रपटांची एक लोकप्रिय अभिनेत्री. मालविकाला मजीदींच्या ‘बियाँड द क्लाऊड्स’ या चित्रपटाची लॉटरी लागली. खुद्द मजीदी यांनी मालविकाची लूक टेस्ट घेतली आणि तिच्या परफॉर्मन्सनी मजीदी कमालीचे प्रभावित झाले होते. मालविकाने सन २०१३ मध्ये ‘नानू मट्टू वरलक्ष्मी’ या मल्याळम चित्रपटाद्वारे अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. मात्र, आता हीच मालविका आता अभिनय क्षेत्राला अनपेक्षित समजते आहे. याविषयी बोलताना ती म्हणते,‘ मी एक खूप शांत आणि लाजाळू तरूणी. अभिनेत्री बनण्याचं कधीही माझं स्वप्न नव्हतं. पण, हे अभिनयाचं क्षेत्र असं आहे की, याच्या सान्निध्यात आलं की, तुम्ही अभिनयापासून दुर जाऊच शकत नाही. माझी खरी आवड म्हणजे अ‍ॅथलेटिक्स आणि लेखण हे आहे. डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याच्या स्वप्नाप्रमाणे आपण अभिनयक्षेत्रात कलाकार होण्याचं स्वप्न पाहू शकत नाही. अभिनय क्षेत्रात येऊन तुम्ही कितीही मेहनत घेतली आणि तुमच्या नशिबात जर नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही. अनेक वेळा असंही होतं की, तुम्ही मेहनत ही नाही घेतली तरी तुम्ही सुपरस्टार होता. सध्या बॉलिवूडमध्ये अनेक जण आहेत जे कोणतीही मेहनत न घेता प्रसिद्ध झाले आहेत.’ ‘बियाँड द क्लाऊड्स’ या माजिद मजिदी यांच्या चित्रपटात अभिनेत्री मालविका मोहनन ही इशान खट्टरच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली. तिची निवड स्वत: माजिद मजिदी यांनी केली असल्याचं कळाले. ही भूमिका दीपिका पादुकोण हिला करायची होती. मात्र, मालविकाची निवड केल्याने त्यांनी अभिनेत्री शोधण्याचा शोध थांबवला.