Join us

बॉलिवूड सिनेमात हिरोंचा मार खाणारा 'JoJo' कोण आहे? वाचाल तर हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 1:31 PM

JOJO aka Jeetu Verma : अनेक सिनेमात तुम्ही याला हिरोकडून मार खाताना पाहिलं असेल. त्याच्या भूमिका भलेही लहान होत्या पण तो अजूनही लोकांच्या लक्षात आहे.

बॉलिवूडमध्ये (Bollywood) असे अनेक कलाकार आहे जे त्यांच्या खऱ्या नावांऐवजी त्यांच्या भूमिकांच्या नावाने ओळखले जातात. '3 इडियट्स' मधील 'चतुर' असो वा 'रन' सिनेमातील 'कौवा बिरयानी' या भूमिका इतक्या लोकप्रिय आहेत या कलाकारांच्या नावांऐवजी लोक त्यांना त्यांच्या भूमिकांच्या नावाने ओळखतात. अशी एक भूमिका आहे 'जोजो'.

तुम्ही जर गुगलवर JOJO सर्च केलं तर बॉलिवूडचे अनेक व्हिडीओ समोर येतील. या व्हिडीओवरून तुम्हाला कळेल की, जोजो कोण आहे. या कलाकाराला तुम्ही अनेक सिनेमात पाहिलं असेल. अनेक सिनेमात तुम्ही याला हिरोकडून मार खाताना पाहिलं असेल. त्याच्या भूमिका भलेही लहान होत्या पण तो अजूनही लोकांच्या लक्षात आहे.

जोजोने अनेक बॉलिवूड सिनेमात साइड व्हिलनच्या भूमिका साकारल्या आहेत. 'जोजो' या नावाने प्रसिद्ध अभिनेता मुळचा राजस्थानचा आहे आणि त्याचं खरं नाव जीतू वर्मा (Jeetu Verma) आहे. तो बॉलिवूडचे प्रसिद्ध अॅक्शन दिग्दर्शक टीनू वर्मा यांचा लहान भाऊ आहे. तर त्याचे इतर दोन भाऊ महेंद्र वर्मा आणि भीकू वर्मा हेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आहेत. जीतू वर्माचे वडील बद्री प्रसाद वर्मा जयदेव हे १९६० आणि ७० च्या काळात बॉलिवूडमध्ये एक मोठे स्टंटमॅन होते.

जीतू वर्मा साधारण २५ वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये आहे. आतापर्यंत त्याने ५० पेक्षा जास्त सिनेमात काम केलं. पण आजही त्याला बॉलिवूडमध्ये त्याच्या खऱ्या नावाने कमी आणि भूमिकेच्या नावाने ओळखलं जातं. जीतूने त्याच्या अभिनयाची सुरूवात १९९४ मध्ये आलेल्या  'The Maharaja’s Daughter' नावाच्या इंग्रजी सीरीजमधून केली होती. यात त्याची एका डान्सरची भूमिका होती. त्याच्या दोन वर्षांनी तो बॉलिवूडमध्ये आला.

जीतू वर्माने १९९६ मध्ये अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीचा सिनेमा 'सपूत' मधून डेब्यू केलं होतं. त्यानंतर तो बडे मियां छोटे मियांमध्ये दिसला होता. पण ज्या सिनेमाने त्याला जोजो अशी ओळख दिली तो सिनेमा होता बॉबी देओलचा 'सोल्जर' सिनेमा यातील त्याची जोजोची भूमिका गाजली होती.

त्यानंतर जोजोने 'बादल', 'कुंवारा', 'क्रान्ति', 'तलाश', 'हमराज', 'टार्ज़न: द वंडर कार', 'किसना', 'बोल बच्चन', 'सरदार ऑफ़ सरदार', 'ज़ंजीर', 'बॉडीगार्ड', 'जय हो', 'गोलमाल 3', 'एक्शन जैक्शन' और 'किस किस को प्यार करूं' सारख्या अनेक गाजलेल्या सिनेमात काम केलं. जीतू वर्मा नुकताच 'मिर्झापूर' या वेबसीरीजमध्येही दिसला होता. 

टॅग्स :बॉलिवूडइंटरेस्टींग फॅक्ट्स