Ranveer Singh Nude Photoshoot : बॉलिवूडचा पॉवर पॅक्ड अभिनेता म्हणून ओळखला जाणारा रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या भलताच चर्चेत आहे. या चर्चेचं कारण तुम्हाला ठाऊक आहेच. होय, रणवीर सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. त्याच्या या न्यूड फोटोशूटमुळे सध्या वातावरण तापलं आहे. इंडस्ट्रीतल्या काहीजणांनी त्याच्या या फोटोशूटचं कौतुक केलं असलं तरी अनेकांना त्याचं हे वागणं खटकलं आहे. म्हणूनच रणवीरवर जबरदस्त टीका होतेय. इतकंच नाही तर मुंबईतील एका पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. संपूर्ण जग रणवीरच्या या फोटोशूटबद्दल बोलत असताना ज्याने हे फोटोशूट केलं तो कोण? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर आज आम्ही त्याच्याच बद्दल सांगणार आहोत.
तर रणवीरचे न्यूड फोटो क्लिक करणाऱ्या फोटोग्राफरचं नाव आशीष शाह आहे. हे फोटोशूट कुठे झालं? तर मुंबईच्या मेहबूब स्टुडिओत. फोटोग्राफर आशीष शाह हे इंडस्ट्रीतलं एक मोठं नाव आहे. आशीष शाह यांनी हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियनचेही फोटो क्लिक केले आहेत. पण रणवीर सिंगसोबत आशीष यांनी पहिल्यांदा काम केलं. या न्यूड फोटोशूटच्या निमित्ताने आशीष व रणवीर पहिल्यांदा एकत्र आलेत. रणवीरने अगदी सहज आशीष यांना हव्या असलेल्या पोझ दिल्यात. तब्बल 3 तास हे फोटोशूट चाललं.
‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत आशीष शाह यांनी या फोटोशूटबद्दल सांगितलं. असं फोटाशूट करण्याचा निर्णय आशीष आणि रणवीर दोघांनी मिळून घेतला. अशा न्यूड फोटोशूटसाठी मॉडेल फिट हवा,चांगल्या शेपमध्ये हवा. पण रणवीरबद्दल ही समस्या नव्हती. कारण तो नेहमीच फिट असतो, चांगल्या शेपमध्ये असतो. फोटोशूट करण्यासाठी तीन तासांचा वेळ लागला. पण या तीन तासांत रणवीर अगदी कम्फर्टेबल होता. तो ना लाजला, ना अवघडला. त्याने सहज पोझ दिल्यात, असं आशीष यांनी सांगितलं.
मी हजारो लोकांसमोर नेकेड होऊ शकतो...रणवीरने न्यूड फोटोशूट करताना तो किती कम्फर्टेबल होता, हे आधीच सांगितलं आहे. अशा फोटोशूटमध्ये काहीही वाईट नाही. कारण या फोटोत तुम्ही फक्त माझा आत्मा पाहू शकता, असं त्याने म्हटलं आहे. आपल्या या बोल्ड फोटोशूटचं रणवीरने समर्थन केलं आहे. ‘नेकेड फोटोशूट करणं माझ्यासाठी फार कठीण नाहीये. या फोटोंमधून तुम्ही फक्त माझी आत्मा बघू शकता. मी हजारो लोकांसमोर नेकेड होऊ शकतो. माझ्यामुळे ते अस्वस्थ होतील. मात्र मला काहीच अडचण नाहीय,’असं तो म्हणाला.