Join us

ऋषी कपूर यांना कोणी दिले होते निकनेम, जाणून घ्या 'चिंटू' नावामागची इंटरेस्टिंग स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 1:34 PM

ऋषी कपूर यांच्या निकनेम चिंटू मागे आहे इंटरेस्टिंग स्टोरी

कपूर खानदानातील तिसऱ्या पिढीतील सर्वात यशस्वी अभिनेता व बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता ऋषी कपूर यांनी आज जगाला अलविदा केले आहे. त्यांनी विविध भूमिकांतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. ट्विटरवर @chintskap या नावाने हॅण्डल बनवणारे ऋषी कपूर यांनी स्वतःचे निकनेम चिंटू म्हणून सिनेइंडस्ट्रीत प्रचलित होते. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर आणि अर्थहीन गोष्टीमुळे त्यांची ही ओळख हिट ठरली होती. जाणून घेऊया त्यांना हे निकनेम कुणी दिले.

ऋषी कपूर यांचा जन्म 4 सप्टेंबर, 1952 साली झाला होता. त्यांच्या कुटुंबात त्यांच्या जन्माआधीच सिनेइंडस्ट्रीत त्यांंचे आजोबा पृथ्वीराज कपूर व वडील राज कपूर लोकप्रिय होते. घरातच सिनेमाचं वातावरण असल्यामुळे त्यांना बालपणापासूनच सिनेइंडस्ट्रीची ओढ निर्माण झाली होती.

एका मुलाखतीत ऋषी कपूर यांनी सांगितले की, बालपणी जेव्हा त्यांनी त्यांचे भाऊ रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्यासोबत शाळेत जायला सुरूवात केली होती. त्याच काळात त्यांचे नाव चिंटू ठेवले गेले.

ऋषी कपूर यांनी सांगितले होते की, त्यांचा मोठा भाऊ रणधीर यांचे घरात डब्बू नाव होते. त्यावेळी मी पाच वर्षांचा होतो. एक दिवस शाळेत त्यांना एक कोडे आठवले. कोडे असे होते की छोटासा चिंटू मियां, लांब त्याची शेपटी... जिथे जाईल चिंटू मियां तिथे जाईल शेपटी. या कोड्याचं उत्तर होतं सुईधागा.त्यानंतर मोठा भाऊ घरात तेच कोडे बोलू लागले होते. त्यांना त्यातला पहिला शब्द चिंटू खूप भावला की त्यांनी मला चिंटू संबोधायला सुरूवात केली. ते बोलायला लागल्यानंतर हळूहळू माझं निक नेम चिंटू झाले.  

पण, ऋषी कपूर यांनी सांगितले होते की, बालपणीच निश्चित झाले होते की मी माझ्या मुलांचे कोणतेच निक नेम ठेवणार नाही.

 

टॅग्स :ऋषी कपूररणबीर कपूर