Chhaava: दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा 'छावा' हा सिनेमा सध्या चांगलाच गाजत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) थोरले चिरंजीव छत्रपती संभाजी माहाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर मांडणाऱ्या या चित्रपटाची चर्चा चोहीकडे सुरू आहे. १४ फ्रेबुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटात शंभूराजे आणि शिवाजी महाराजांमधील संवाद पाहायला मिळतात. तुम्हाला माहितीये का चित्रपटातील शिवाजी महाराजांचा आवाज नक्की कुणी दिला आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला तर जाणून घेऊया…
'छावा' सिनेमात संभाजी महाराजांच्या बालपणीचे काही काळीज चिरुन टाकणारे प्रसंग आहेत. आबासाहेब म्हणत हाक मारणारे बाल शंभूराजे आणि आपल्या पुत्राच्या हाकेला ओ देणारे छत्रपती शिवाजी महाराज सिनेमात दिसतात. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्यातील बाप-लेकाचं खास नात पाहायला मिळतं. सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज कुठेही दिसत नसले तरी त्याचं अस्तित्व जाणवतं. सिनेमात शिवाजी महाराजांचा आवाज ऐकू येतो. ते शंभू राजेंना मार्गदर्शन करताना दिसून येतात. सिनेमात शिवाजी महाराजांच्या भुमिकेचा आवाज नेमका कोणाचा आहे? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
'छावा' सिनेमातील शिवाजी महाराजांचा आवाज हा खुद्द चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी दिला आहे. डबिंग आर्टिस्ट विजय विक्रम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ही माहिती दिली आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी याबाबत सांगितलं आहे. दरम्यान, सिनेमाने फक्त भारतात नाही तर, जगभरात नवे विक्रम रचले आहेत. दिवसागणिक सिनेमाच्या कमाईच्या अकड्यात मोठी वाढ होत आहे. भारतात सिनेमाने 300 कोटींचा आकडा पार केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त छावा सिनेमाची चर्चा रंगली आहे.