Join us  

​कुणाला इम्प्रेस करतोय सिद्धार्थ??

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2016 4:48 PM

बॉलिवूडचा चॉकलेटी हिरो सिद्धार्थ मल्होत्रावर हजारो मुली मरतात. पण सिद्धार्थ मात्र एकीवरच मरतो आणि तिला इम्प्रेस करण्यासाठी धडपडतो आहे. ...

बॉलिवूडचा चॉकलेटी हिरो सिद्धार्थ मल्होत्रावर हजारो मुली मरतात. पण सिद्धार्थ मात्र एकीवरच मरतो आणि तिला इम्प्रेस करण्यासाठी धडपडतो आहे. होय, तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण सिद्धार्थ एका मुलीच्या विनवण्या करतो आहे. त्याने सोशल मीडियावर टाकलेला एक फोटो आणि कॅप्शनवरून तरी तसेच संकेत मिळत आहे. एका स्टिकवर लावलेला हार्ट असा एक फोटो सिद्धार्थने पोस्ट केला आहे आणि त्याखाली “#throwback Things we do to impress girls…#MenNotBoys stay tuned.” असे मस्त कॅप्शन दिले आहे. आता सिद्धार्थ कुणाला इम्प्रेस  करण्यासाठी धडपडतो आहे, याचा अंदाज तर तुम्ही बांधू शकताच. कदाचित आलिया!! होय आलियाच!!! क्यूट अ‍ॅण्ड बबली आलिया व सिद्धार्थ प्रेमात असल्याच्या बातम्या आहे. या दोघांनी तसे जाहीरपणे मान्य केले नसले तरी ते आता लपून राहिलेले नाही. अलीकडे आलिया व सिद्धार्थच्या ब्रेकअपच्या बातम्याही आल्या. पण आता गोष्टी सुरळीत झाल्या आहेत म्हणे...अशावेळी इम्प्रेस  करना तो बनता है दोस्त!}}}}