Join us

कोण आहे अमन देवगण? 'आजाद'मधून करतोय पदार्पण, अजय देवगणसोबत आहे हे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 1:20 PM

Aman Devgan : अमन देवगण 'आझाद' या चित्रपटातून फिल्मी दुनियेत प्रवेश करणार आहे. अमन देवगण आणि अजय देवगण यांचे आडनाव एकच आहे आणि त्यामुळे दोघांमध्ये काय नाते आहे हे लोकांना जाणून घ्यायचे आहे.

अमन देवगण (Aman Davgan) 'आझाद' (Aazad Movie) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. याआधी त्याच्या चित्रपटाचे पोस्टर समोर आले होते, मात्र आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अमनसोबत अजय देवगण(Ajay Devgan)ही दिसणार आहे. अमन देवगण आणि अजय देवगण यांचे आडनाव एकच आहे आणि त्यामुळे दोघांमधील नाते काय आहे हे लोकांना जाणून घ्यायचे आहे.

अजय देवगण अमन देवगणचा मामा आहे. अजय देवगणला नीलम देवगण आणि कविता देवगण या दोन बहिणी आहेत. अमन हा नीलम देवगणचा मुलगा आहे. अमनने अजय देवगण आणि काजोलसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अमन त्याची चुलत बहीण आणि अजयची मुलगी न्यासा देवगणच्या खूप जवळ आहे. तो न्यासासोबतही अनेकदा स्पॉट झाला आहे.

राशा थडानीसोबत रोमांस करताना दिसणार अमन देवगणआता अमन अजय देवगणसोबत 'आझाद' या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत प्रवेश करणार आहे. 'आझाद' चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करत आहे. रवीना टंडनची मुलगी राशा थडानी देखील या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशा या चित्रपटात अमनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. याशिवाय डायना पेंटीही या चित्रपटात दिसणार आहे.

अजय देवगण वर्कफ्रंटअजय देवगण सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिंघम अगेन या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यांचा हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर १ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर, सिंघम अगेनचा सामना कार्तिक आर्यनचा हॉरर-कॉमेडी चित्रपट भूल भुलैया ३ आहे. मात्र, संघर्षानंतरही हा चित्रपट दमदार कलेक्शन करत आहे. याशिवाय अजय देवगणचे 'दे दे प्यार दे २' आणि 'रेड २' सारखे चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत.

टॅग्स :अजय देवगण