नव्वदच्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) सध्या ''पटना शुक्ला'' (Karma Calling) या सिनेमामुळे चर्चेत आहे. अलीकडेच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. रवीना कोट्यवधींची मालकीण आहे. स्वतःच्या बळावर करोडोंची संपत्ती कमावली आहे. तर तिचा पतीदेखील कोटींचा मालक आहे. रवीना टंडनचा पतीदेखील फिल्म इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. तर आज आपण अनिल थडानी यांच्याबद्दल जाणून घेऊया.
रवीनाचा पती अनिल थडानी AA Flims या नॉन-स्टुडिओ वितरण कंपनीचा संस्थापक असून कोट्यवधी संपत्तीचे ते मालक आहेत. अनिल थडानी यांच्या वितरण कंपनीने दक्षिणेतील चार बिग बजेट चित्रपटांच्या हिंदी व्हर्जनचे हक्क विकत घेतले आहेत. यामध्ये अल्लू अर्जुनचा मोठा चित्रपट पुष्पा 2: द रुल, राम चरणचा गेम चेंजर, प्रभाश आणि दीपिका पदुकोणचा कल्की 2898 एडी आणि जूनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान स्टारर देवरा: भाग 1 यांचा समावेश आहे.
अनिल थडानींचे वडील निर्माते व दिग्दर्शक कुंदन थडानी होते. थडानी कुटुंब हे गेल्या अनेक वर्षांपासून डिस्ट्रीब्युशनच्या व्यवसायात आहेत. रविना टंडनने 2004 मध्ये अनिल थडानी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. रविनाच्या वाढदिवशी अनिल यांनी तिला लग्नाची मागणी घातली. त्यांना राशा आणि रणबीर ही दोन अपत्ये आहेत. रविनासोबत लग्न करणाऱ्या अनिल यांचं हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी त्यांनी नताशा सिप्पी सोबत पहिलं लग्न केलं होतं. लाइफस्टाइल एशिया आणि सार्वजनिकरित्या उपलब्ध डेटानुसार, रवीना टंडनची अंदाजे एकूण संपत्ती 166 कोटी रुपये आहे. पण, तिचे पती अनिल थडानी यांची एकूण संपत्तीची नेमकी माहिती अद्याप उपलब्ध नाही.