बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत येत आहे. वयाच्या 56 व्या वर्षी अरबाजने शूरा खान (Sshura Khan) हिच्यासोबत लग्न केलं. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. इतकंच नाही तर नेटकरी सध्या शूराविषयी जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्येच आता शूरा आणि अरबाज यांच्या वयातील अंतराची चर्चा रंगली आहे.
एका सिनेमाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या शूरा आणि अरबाज यांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. अरबाजने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत त्याच्या निकाहची माहिती चाहत्यांना दिली. त्याची ही पोस्ट पाहिल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
शूरा आणि अरबाजच्या वयात किती आहे अंतर
शूरा एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट असून ती बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. अरबाजने वयाच्या ५६ व्या वर्षी लग्नगाठ बांधल्यामुळे आता शूराचं वय किती असेल असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. शूरा आणि अरबाज यांच्या वयात १५ वर्षांचं अंतर आहे.
नेमकं किती आहे शूराचं वय?
अरबाजपेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या शूराचं वय ४१ वर्ष असल्याचं सांगण्यात येतं. शूरापूर्वी अरबाज जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र, काही महिन्यांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर त्याने शूराला डेट करायला सुरुवात केली. 'पटना शुक्ला' या सिनेमाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली. काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडीने निकाह करण्याचा निर्णय घेतला.