Join us  

Hrithik Roshanसोबत हातात हात घालून दिसलेली ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण? अखेर झाला खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 6:21 PM

Hrithik Roshan Mystery Girl : हृतिकचे या मिस्ट्री गर्लसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि  ही मिस्ट्री गर्ल कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हृतिक रोशन (Hritik Roshan) सध्या सिनेमांपासून दूर आहे. पण तरीही हृतिकची चर्चा कमी नाही. वेगवेगळ्या अ‍ॅक्ट्रेस व मॉडेल्ससोबतचे त्याचे फोटो व व्हिडीओ चर्चेत आहेत. आधी तो सामंथा लॉकवूडसोबत दिसला आणि काल एका मिस्ट्री गर्लसोबतचा त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला.  हृतिक व ही मिस्ट्री गर्ल दोघंही मुंबईतील एका जपानी रेस्टॉरन्टमध्ये डिनरला गेले असताना स्पॉट झालेत. हृतिक रोशनने रेस्टॉरन्टमधून बाहेर पडतांना या मिस्ट्री गर्लचा हात धरला आणि तिला आपल्या लक्झरी गाडी बसवलं. त्यानंतर दोघेही निघून गेलेत.

पापाराजी हृतिकला थांबून पोज देण्यासाठी सांगत होते. पण तो थांबला नाही. इतकंच नाही तर हृतिक या मिस्ट्री गर्लला कॅमेरापासून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसला आणि तिच्यासोबत गाडीत बसून निघून गेला. हृतिकचे या मिस्ट्री गर्लसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि फॅन्सच्या मनात मिस्ट्री गर्लबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.  ही मिस्ट्री गर्ल कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर ती दुसरी तिसरी कोणी नसून सबा आझाद (Who is Saba Azad/ Saba Singh Grewal) आहे.

आता ही सबा आझाद कोण हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर ती एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. 1 नोव्हेंबर 1990 रोजी जन्मलेली आणि दिल्लीत लहानाची मोठी झालेल्या सबाने थिएटर आर्टिस्ट म्हणून अ‍ॅक्टिंग करिअरला सुरूवात केली. यानंतर ती चित्रपटांकडे वळली. 2008 साली ‘दिल कबड्डी’ या सिनेमातून तिचा डेब्यू झाला. यात ती राहुल बोससोबत स्क्रिन शेअर करताना दिसली होती. पण तिला ओळख दिली ती 2011 साली रिलीज ‘मुझसे फ्रेन्डशिप करोगे’ या सिनेमाने. यात तिच्या अपोझिट साकिब सलीम दिसला होता. त्याआधी सबाने अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलं आहे. 2021 साली म्हणजे गतवर्षी ती ‘फील्स लाइक इश्क’ या सिनेमात दिसली होती.

2010 साली सबाने स्वत:ची थिएटर कंपनी उघडली होती. सबाला थिएटरसोबत गाण्याचाही शौक आहे. नसीरूद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाहसोबत तिने ‘Madboy / Mink’ या इलेक्ट्रॉनिक बँडची सुरूवात केली होती़ 2013 साली इमादने सबासोबतचं रिलेशनशिप पब्लिक केलं होतं. सबा व मी दोन वर्षांपासून एकत्र राहत असून मी रिलेशनशिपमध्ये आहे, असं इमाद म्हणाला होता. या रिलेशनशिपचं पुढे काय झालं, ते अद्याप गुलदस्त्यात आहे. 2013 साली यशराज फिल्म टॅलेंट डिव्हिजनने ‘धूम अँथम’चा व्हिडीओ आपल्या युट्यूब चॅनलवर रिलीज केला होता़ यात सबाला कास्ट करण्यात आलं होतं. या अँथमला तिनं आपला आवाज दिला होता.

यानंतर तिने नौटंकी साला, शानदार, कारवां आणि मर्द को दर्द नहीं होता यासारख्या सिनेमात गाणी गायली. नेटफ्लिक्सवरच्या ‘फील्स लाइक इश्क’ या सीरिजमध्ये तिने काम केलंय. लवकरच ती सोनी लिव्हवरच्या ‘रॉकेट बॉयज’ या सीरिजमध्ये झळकणार आहे़ ही 2017 साली तिन् सबा सुल्तान आझाद हे नाव बदलून सबा सिंह ग्रेवाल करण्याचा निर्णय घेतला होता. इन्स्टावर याबाबतची पोस्ट तिने शेअर केली होती. आझाद या आडनावामुळे सोशल मीडियावर लोक नको ते बोलतात, यामुळे हा निर्णय घेतल्याचं तिने म्हटलं होतं.   

टॅग्स :हृतिक रोशन