अभिनेत्री कंगना राणौतने भाजपमध्ये प्रवेश करून राजकारणात एन्ट्री घेतली आहे. कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी येथून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार आहे. रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये रामाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेला अरुण गोविल हेदेखील भाजपकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. पक्षाने त्यांना मेरठमधून उमेदवारी दिली आहे.
कंगना राणौतने 'गँगस्टर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिनं 'क्वीन', 'पंगा', 'धाकड', 'मणिकर्णिका', 'तनु वेड्स मनू' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. फक्त काही चित्रपट यशस्वी झाले असले तरी कंगनाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये खूप नाव आणि पैसा कमावला आहे. कंगना सध्या 95 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालकीन आहे.
कंगना राणौत आलिशान आयुष्य जगते. कोइमोइच्या मते, कंगनाकडे मुंबईत 5BHK अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत 20 कोटी रुपये आहे. याशिवाय कंगनाचा मनालीजवळ ३० कोटी रुपयांचा आलिशान बंगला आहे. घराव्यतिरिक्त कंगना एका ऑफिसचीही मालकीण आहे. हे कार्यालय पाली हिल्समध्ये असून त्याची किंमत ४८ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. यासोबतच कंगना राणौतकडेही आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे.
अरुण गोविलक यांच्याकडेही पैशांची कमतरता नाही. 'राम' नावाने ओळखल्या जाणाऱ्या या टीव्ही अभिनेत्याकडे ४१ ते ४९ कोटी रुपयांची संपत्ती आहे. अरुण गोविल यांनी रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेतून नाव आणि पैसा कमावला. या मालिकेच्या एका एपिसोडसाठी ते ५१ हजार रुपये घेत असत. अरुण यांनी 'ओ माय गॉड 2' मध्ये भूमिका साकारली होती, ज्यासाठी त्यांनी 50 लाख रुपये फी घेतली होती.