Join us  

देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 2:41 PM

सैफ अली खानने देशातला सर्वात प्रभावशाली नेता कोण असं विचारताच या राजकीय व्यक्तीचं नाव घेतलंय (saif ali khan)

सैफ अली खान हा मनोरंजन विश्वातीलल लोकप्रिय अभिनेता. सैफला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. सैफ अली खानने 'दिल चाहता है', 'हम तुम', 'तारा रम पम', 'एजंट विनोद', 'विक्रम वेधा' अशा सिनेमांमधून अभिनयक्षेत्रात स्वतःची वेगळीच छाप पाडलीय. सैफने नुकतंच साऊथच्या सिनेमांमध्ये पदार्पण करुन ज्यु.एनटीआरसोबत सैफचा 'देवरा' सिनेमा आज रिलीज झालाय. अलीकडेच सैफने एका मुलाखतीत सध्याच्या भारतीय राजकारणावर भाष्य केलंय.

सैफने देशातील प्रभावशाली नेता म्हणून घेतलं या व्यक्तीचं नाव

सैफ नुकताच india today conclave मध्ये सहभागी झाला होता. यावेळी सैफने सध्याचं भारतीय राजकारण याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, राहुल गांधींविषयक प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली. याच मुलाखतीत सध्याच्या राजकारणातील प्रभावी नेता कोणता आहे जो देशाला पुढे नेऊ शकतो? असं विचारताच सैफने राहुल गांधींचं नाव घेतलं. सैफ म्हणाला, "मला वाटतं आपल्या देशातील सर्वच राजकीय नेते प्रभावशाली आणि धाडसी आहेत. जर कोणा एकाचं नाव घ्यायचं असेल तर मी राहुल गांधींचं नाव घेतो. राहुल गांधींनी जे केलंय ते खूप प्रभावशाली आहे."

सैफ राजकारणात प्रवेश करणार का?

सैफ याच मुलाखतीत पुढे म्हणाला,"मला आठवतंय की एक काळ असा होता जेव्हा राहुल गांधीचं भाषण आणि त्यांच्या कामावर टीका केली जायची. परंतु स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर राहुल गांधींनी संपूर्ण परिस्थिती बदलली आहे." पुढे राजकीय प्रवेशाबद्दल विचारताच सैफ म्हणाला,"मला राजकीय नेता बनण्यात काहीही रस नाही. जर मला एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर स्वतःचं म्हणणं मांडायचं असेल तरच मी राजकारणात येऊन नेता बनण्याचा विचार करेन."  सैफचा ज्यु.एनटीआरसोबतचा 'देवरा पार्ट १' सिनेमा रिलीज झाला असून सैफ या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारतोय.

टॅग्स :सैफ अली खान बॉलिवूडराहुल गांधी