Join us  

'कल्कि २८९८ एडी' सिनेमात श्रीकृष्णाची भूमिका कोणी साकारली? रहस्याचा झाला उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 4:34 PM

'कल्कि २८९८ एडी' सिनेमात श्रीकृष्णाची भूमिका कोणी साकारली याचा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे (kalki 2898 ad)

 'कल्कि २८९८ एडी' सिनेमाची चर्चा सध्या जोरात आहे. हा सिनेमा महाभारत आणि आधुनिक काळ यांच्यातला मेळ दाखवण्यात यशस्वी झाला. अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, कमल हासन आणि प्रभास या कलाकारांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची विशेष गोष्ट म्हणजे बॉलिवूड आणि साऊथ मनोरंजन विश्वातील अनेक लोकप्रिय चेहरे सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत. 

 'कल्कि २८९८ एडी' मध्ये श्रीकृष्णाची भूमिका कोणी साकारलीय?

 'कल्कि २८९८ एडी'मध्ये श्रीकृष्णाची भूमिका कोणी साकारलीय याविषयी विविध तर्कवितर्क लावले जात होते. सिनेमात श्रीकृष्णाची भूमिका साकारल्या कलाकाराचा चेहरा लपवण्यात आला आहे. अखेर ही भूमिका कोणी साकारलीय याचा खुलासा झालाय. या अभिनेत्याचं नाव आहे आहे कृष्ण कुमार.

अभिनेत्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडल सिनेमातील काही दृश्य दाखवत कल्कीचा कृष्ण दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वत: असल्याचं सांगितलं आहे. विशेष गोष्ट सांगायची तर, श्रीकृष्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं खऱ्या आयुष्यातलं नावही कृष्णा आहे. ही महान व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर साकारण्याची संधी मिळाल्याने त्याने 'कल्कि 2898 एडी'च्या निर्मात्यांचे आभार मानले आहेत.

 'कल्कि २८९८ एडी' सिनेमाबद्दल

 'कल्कि २८९८ एडी' सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे. काल गुरुवारी २७ जूनला हा सिनेमा जगभरात रिलीज झालाय. विशेष म्हणजे सिनेमात महाभारताचा सुरेख संबंध जोडण्यात आलाय. 'अश्वत्थामा' आणि 'श्रीकृष्ण' यांच्यातला भन्नाट संवाद सिनेमात पाहायला मिळतो. सिनेमात प्रभास, दीपिका पादुकोण, कमल हासन, अमिताभ बच्चन या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. पहिल्याच दिवशी जगभरातून सिनेमाने १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय. 

टॅग्स :अमिताभ बच्चनप्रभासदीपिका पादुकोणकमल हासन